अहमदनगर Uddhav Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. "आता देशात कोरोनाची स्थिती नाही. पण, एक व्हायरस देशात फोफावतोय. हा तो हुकूमशाहीचा प्रकार आहे. आपण जसे कोरोनापासून दोन हात दूर राहत होतो, तसंच या व्हायरसपासून तुम्ही दुर रहा," असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. आता या व्हायरसला महाराष्ट्रातून संपून टाका," असं आवाहनदेखील उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय.
भाजपाला मोठा धक्का : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच खासदार संजय राऊत यांनी आजपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय दौरा सुरू केला आहे. सोनई, राहुरी, नंतर श्रीरामपूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाना साधला आहे. यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, "भाजपा तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज मोठा फटका बसला आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणी बाहेर पडल्यास शिवसेनेला धक्का बसल्याचं बोललं जातं. मात्र, भाजपानं ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, तेच भाजपामध्ये दाखल झालेय. त्यामुळ हा भाजपाला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीला अजिबात धक्का बसलेला नाही. शिवसेनेला तर अजिबात धक्का बसलेला नाही. शिवसेना इतरांना धक्के देते", असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
भाजपामध्ये क्लिन चिट मोदींची हमी : "भाजपामध्ये भ्रष्टाचाऱ्यांना थारा नाही, असं भाजपावाले म्हणत आहेत. मात्र मला मोदींना विचारायचं आहे. तुम्ही म्हणताय मोदींची हमी ती हीच आहे का?. तुम्ही कितीही भ्रष्टाचार करा, पण तुम्ही भाजपामध्ये तुम्हाला क्लिन चिट म्हणजे मोदींची हमी असल्याची ठीका ठाकरेंनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. तिथं अशोक चव्हाणांनी जायला हवं होतं. मात्र, चव्हाण हे मोदींच्या दारात जावून उभे राहीले,ठ अशी टीका यावेळी ठाकरेंनी केली.
हे वाचलंत का :