ETV Bharat / state

"अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत विश्वचषक हरला"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - uddhav thackeray on amit shah - UDDHAV THACKERAY ON AMIT SHAH

Uddhav Thackeray on Amit Shah : "अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत हा विश्वचषकाचा अंतिम सामना हरला," असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय. 'पुत्रप्रेम' या शब्दावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलंय. यात आता उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 4:35 PM IST

Updated : Apr 15, 2024, 5:40 PM IST

मुंबई Uddhav Thackeray on Amit Shah : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलीय. आरोप-प्रत्यारोप, टीका-टीपण्णी करताना सर्वच राजकीय नेते सध्या दिसून येत आहेत. यात आता 'पुत्रप्रेम' हा शब्द नव्यानं समोर आलाय. "पुत्रप्रेमामुळंच शिवसेना फुटली," असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. याला आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पुत्रप्रेमामुळं भारत सामना हरला : मुंबई, नवी मुंबईतील मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. पुत्रप्रेमामुळंच शिवसेना फुटली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी भंडारा येथील सभेतून केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत हा विश्वचषकाचा अंतिम सामना हरला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि जय शाह यांना टोमणा लगावला. याचा अर्थ असा होतो की, 2023 मध्ये विश्वचषक झाला. याचा अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे ऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला अंतिम सामना भारतानं हरला होता. दरम्यान, अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे 'बीसीसीआय' मध्ये वरिष्ठ पदावर आहेत. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला.

काय म्हणाले होते अमित शाह? : ‘‘पक्ष फोडण्याचं काम आम्ही करत नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे दोन तुकडे झाले आहेत. यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाते. पण, उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम तर शरद पवार यांच्या कन्याप्रेमामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले आहेत,’’ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

अमित शाहांवर टीका : शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "अमित शाह यांना मला सांगायचंय तुमच्या पुत्रप्रेमामुळं भारत अंतिम सामना हरलेला आहे. तसं पुत्रप्रेमी काही दाखवलेलं नाही. अमित शाह यांचे पक्षातले स्थान काय? कारण ते आता त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष देखील नाहीत. आता अध्यक्षांना किती अधिकार आहेत हा मुद्दा वेगळा. तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांच्या आणि तुमच्या बोलण्यात एक वाक्यता असू दे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईन म्हणालो आणि दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. त्यामुळं तुम्ही आणि तुमच्या चेलेचपाट्यांच्या बोलण्यात एक वाक्यता असू दे. कारण तुमचे चेलेचपाटेच तुमची लाज काढत आहेत. सोबतच तुमच्या पुत्रप्रेमामुळं भारत जो अंतिम सामना हरला, त्याबद्दल आपण बोललात तर बरं होईल."

मालमत्ता कर माफ करणार : "2020-21 या आर्थिक वर्षात शिवसेना ठाकरे गटानं बृहन्मुंबई महानगरपालिकेत 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. असाच निर्णय आपली सत्ता आल्यास आपण नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये देखील घेऊ, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, "नवी मुंबईमध्ये सिडको आणि महानगरपालिका मालमत्ता कर आकारात आहेत. त्यामुळं इथल्या नागरिकांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागत आहे. मुंबई महानगरपालिकेत मी आश्वासन दिलं होतं 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ करू. त्याचप्रमाणं आमची सत्ता आल्यास इतर ठिकाणी देखील मालमत्ता कर माफ करू. कारण नसताना डबल कर आकारला जातोय. कर भरण्याला विरोध नाही. मात्र, या वसुली सरकारच्या काळात ही वसुली केली जात आहे."

हेही वाचा -

  1. संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut
  2. चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू; 'श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटींचा घोटाळा,' संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegations
  3. इंदिरा गांधींनी गरिबी हटवण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्याचं काय झालं?, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?; अमित शाहांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 15, 2024, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.