ETV Bharat / state

दारू सोडविण्यासाठी गेले आणि मृतदेहच परत आले; औषध देणाऱ्या वैद्यावर गुन्हा दाखल - Two People Died

Two People Died : चंद्रपूर जिल्ह्यातील एका वैद्याकडं दारू सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना (Two Died) दारू सोडवण्याच्या औषधामुळं आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी वैद्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Two youths died
दोन तरुणांचा मृत्यू (Chandrapur Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 10:45 PM IST

Updated : May 22, 2024, 10:52 PM IST

चंद्रपूर Two People Died : दारू सोडवण्याचं औषध प्राशन केल्यानं दोन तरुणांचा मृत्यू (Two Died) तर दोन जण गंभीर झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडलीय. भद्रावती तालुक्यातील हे तरुण असून ते दारू सोडवण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका वैद्याकडं गेले होते. या प्रकरणात वैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार इंगळे यांनी दिली.

अशी घडली घटना : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठल्यापासून ग्रामीण भागात व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळं दारूचं व्यसन सोडण्यासाठी पीडित मिळेल ते उपाय करतात. यात गावठी उपाय म्हणून वैद किंवा बाबाकडं जास्त कल असतो. भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील सहयोग सदाशिव जीवतोडे वय (१९) आणि प्रतीक घनश्याम दडमल वय (२६) वर्ष, सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय (४५) आणि सोमेश्वर उद्धव वाकडे वय (३५) यांना वर्धा जिल्ह्यातील शेळके महाराज नामक वैद्य यांनी अनेकांची दारू सोडवीतात अशी माहिती मिळाली होती.

दारू सोडविण्याची दिली भुकटी : सोमवारी (ता. 21) ते वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे शेळके महाराज याकडं गेले होते. या वैद्याने त्यांना दारू सोडविण्याची भुकटी दिली होती. ती चौघांनी घेतली आणि सायंकाळी ते आपल्या गावी परतत असताना अचानक सर्वांची प्रकृती बिघडली. त्यांना भद्रावती येथील खासगी दवाखान्यात तातडीनं दाखल करण्यात आलं. मात्र, यात सहयोग सदाशिव जीवतोडे आणि प्रतीक घनश्याम दडमल यांचा मृत्यू झाला. तर सोमेश्वर वाकडे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी समुद्रपूर येथे शेळके महाराज वैद्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

शेळके महाराजाच्या उपचारामुळं अनेकांचे गेले बळी? : या परिसरात शेळके महाराज हे वैद्य प्रसिद्ध आहे. त्याच्याकडं अनेक लोक दारू सोडविण्यासाठी येतात. त्यांना ते खाण्यासाठी भुकटी देतात. मात्र ती खाल्ल्यानं अनेक जणांवर याचा विपरीत परिणाम झाला. काहींचा यात जीव गेल्याची देखील माहिती आहे. त्यामुळं या प्रकरणात शेळके महाराजाची कसून चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा -

  1. मतदानाच्या तोंडावर पालघरमध्ये पाच लाखांची दमणची अवैध दारू जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई - DAMANS LIQUOR SEIZED IN PALGHAR
  2. दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : बीआरएस नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ - Delhi Excise Policy Case
  3. छत्तीसगडमधील 776 कोटी रुपयांच्या दारु घोटाळ्यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक - Chhattisgarh Liquor Scam

Last Updated : May 22, 2024, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.