ETV Bharat / state

लग्न करुन देत नाही म्हणून दोन भावांनी बापाला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना - brothers killed father - BROTHERS KILLED FATHER

Brothers killed father: वडील लग्न करुन देत नाही आणि जमिनीचे वाटे करत नाहीत या कारणावरुन मुलांनी बापाला मारलं. पोलिसांनी दोन्ही मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतलं आहे.

Sambhajinagar Crime
छत्रपती संभाजीनगर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 12:40 PM IST

छत्रपती संभाजीनगर Brothers killed father - शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लग्न करुन देत नाही आणि जमिनीचे वाटे का करत नाही असा आरोप करत दोन मुलांनी वडिलांची चाकूनं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडालीय. संपत लक्ष्मण वाहुळे असं मृत वडिलांचं नाव असून वडगाव कोल्हाटी या भागात ही घटना घडलीय. या घटनेतील आरोपी मुलांना वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.

नेमकं प्रकरण काय : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहूळ व प्रकाश वाहूळ ही दोन मुलं आहेत. वाहूळ यांच्या नावावर शेती आहे तर यांची दोन्ही मुलं खासगी कंपनीत काम करतात. ८ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास संपत वाहूळ हे एकटेच घरी होते. त्यांचा मुलगा प्रकाश हा कामारून घरी येताच त्याने वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात करतो. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा पोपटतही घरी आला असता तोही मारहाण करण्यास सुरूवात करतो. दोघेही मारहाण का करताय? असा जाब विचारला असता आमचं लग्न करुन देत नाही आणि शेतीही वाटून देत नाही असं म्हणत मोठ्या मुलानं चाकू घेऊन सपासप वार केले. संपत वाहूळ यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरड झाल्यानं संपत वाहूळ यांचे भाऊ रामनाथ वाहूळ, संजय वाहूळ,आकाश व संदीप वाहूळ हे मदतीस धाऊन आले. त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. संपत वाहूळ यांना घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

उपचार दरम्यान मृत्यू : याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असताना २३ मे रोजी रात्री बाराच्या वाजेच्या दरम्यान संपत वाहूळ यांचा मृत्यू झाला. संपत यांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोपट वाहूळ व प्रकाश वाहूळ या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

  1. डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 11 वर , शोधकार्य सुरुच - Dombivli MIDC Blast
  2. वयाच्या 16 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी काम्या कार्तिकेयन आहे तरी कोण? जाणून घ्या तिचे आत्तापर्यंतचे विक्रम - Kamya Karthikeyan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.