ETV Bharat / state

अंबर दलाल विरोधात बाराशे तक्रारदारांनी केली तक्रार, 600 कोटींचा लावला चुना - Mumbai Crime News - MUMBAI CRIME NEWS

Mumbai Crime News : फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांना अंबर दलाल (Amber Dalal) यानं 54 कोटींचा गंडा घातल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तो आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात होता. त्यानंतर बाराशे तक्रारदार पोलीस ठाण्यामध्ये येऊन दलाल विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

Amber Dalal News
अंबर दलाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 10:33 PM IST

मुंबई Mumbai Crime News : जुहूमध्ये राहणाऱ्या फॅशन डिझायनर बबीता मलकानी या महिलेचे 54 कोटींची फसवणूक करणारा रिट्स कन्सल्टन्सीचा मालक अंबर दलाल (Amber Dalal) विरोधात 15 मार्चला ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बाराशे तक्रारदार पोलीस ठाण्यामध्ये येऊन दलाल विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, ओशिवरा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला आहे. आता सर्व तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडं तपासासाठी देण्यात आल्या आहेत.

अंबर दलाल विरोधात तक्रार दाखल : या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितलं की, जवळपास 1200 तक्रारदारानं अंबर दलाल विरोधात तक्रार दाखल केली आहे. एकूण 600 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. 27 मार्चला उत्तराखंडच्या डेहराडूनमधील एका हॉटेलमधून आरोपी अंबर दलालला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं आरोपी अंबर दलाला पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, सध्या अंबर दलाल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

54 कोटींचा चुना लावल्याची तक्रार : ओशिवरा पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेकडं गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर एक हजार गुंतवणूकदारांना 100 कोटींपेक्षा अधिक गंडा घालणाऱ्या अंबर दलाल या सीए विरोधात मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्कुलर (LOC) काढलं होतं. फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांनी त्यांना अंबर दलाल यांनी 54 कोटींचा चुना लावल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तो आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त निषित मिश्रा यांनी दिली होती.

जुहूतील फॅशन डिझायनरनं दाखल केली तक्रार : ओशिवरा पोलीस ठाण्यात 15 मार्चला रिट्स कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीचा मालक अंबर दलाल याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जुहूतील फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांनी तक्रार दाखल केली होती. एप्रिल 2023 मध्ये या फॅशन डिझाईनर बबीता मलकानींची मित्रमंडळींमार्फत दलाल याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर नफा देण्याचं आमिष दलाल यानं दाखवलं होती. दलालनं फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांना सांगितलं की, तुमचे पैसे वेगवेगळ्या कमोडिटीजमध्ये गुंतवून दीड ते 1.8 टक्के नफा मिळेल. दलाल याने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयु) देखील सही करुन दिला होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

विविध कलमानुसार गुन्हा दाखल : फॅशन डिझायनर बबीता मलकानी (वय 56) या महिलेनं एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत चार्टर्ड अकाउंटंट अंबर दलाल याला 54 कोटी 45 लाख रुपये दिले आहेत. या गुंतवणुकीत वेगवेगळ्या व्यक्तींची देखील गुंतवणूक आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक पैसे गुंतवणूकदारांनी दलाल याच्याकडं गुंतवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तक्रारदार बबीता मलकानी या जुहू परिसरातील गांधीग्राम इथं राहतात. अंबर दलाल विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 406, 409 आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्टच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अधिक चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

हेही वाचा -

  1. माहीममध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक; ट्रस्टसह तिघांविरोधात गुन्हा दाखल - Mutual Sale Of property
  2. "मी अक्षय कुमारच्या प्रोडक्शन कंपनीतून बोलतोय" सांगून मुलीची फसवणूक करण्याचा प्रयत्न - Lure Of Work In Film
  3. झारखंडमधील कंपनीची ५ कोटी ८९ लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - EMMAR EMPLOYEES PRIVATE LIMITED

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.