ETV Bharat / state

डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve

Melghat Tiger Reserve : मेळघाट जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघाचं दर्शन झालं. मेळघाटात सहसा वाघाचं दर्शन घडत नाही. परंतु हरीसाल-सेमाडोह रेंजमध्ये अनेकांना वाघ दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सेमाडोह परिसर फुलत आहे.

मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार
मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 2:12 PM IST

Updated : Jun 8, 2024, 7:38 PM IST

अमरावती Melghat Tiger Reserve : जंगल सफारी दरम्यान मेळघाटच्या घनदाट जंगलात जोरदार डरकाळी फोडत अगदी काही अंतरावरुन वाघ जात असल्याचं दृश्य पर्यटकांनी अनुभवलं. वाघाच्या डरकाळीचा आवाज आणि त्याचं तोऱ्यात चालणं हा आगळावेगळा थरार मेळघाटातील सेमाडोह जंगलात पर्यटकांनी अनुभवला. वाघ दिसल्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी लय भारी असल्याचा अनुभव वाघ पाहणाऱ्या पर्यटकांना येत आहे.

डरकाळी फोडत आला वाघ (ETV Bharat Reporter)

मेळघाटात सध्या 56 वाघ : सातपुडा पर्वत रांगेत दरी आणि उंच पहाडांनी वेढलेलं मेळघाटचे जंगल हे वाघांसाठी अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. मेळघाटात सध्याच्या घडीला एकूण 56 वाघ आहेत. असं असले तरी मेळघाटात सहसा वाघाचं दर्शन घडत नाही. मात्र, गत दोन अडीच वर्षांपासून हरीसाल -सेमाडोह रेंजमध्ये अनेकांना वाघ दिसत आहेत. सेमाडोह ते हरीसाल दरम्यान असणाऱ्या पिली गावालगतच्या जंगलात वाघाचं वास्तव्य असून, या मार्गानं जाणाऱ्या अनेकांना हा वाघ दिसला आहे. या भागात एक नव्हे, तर दोन-तीन वाघ अनेकांना आढळले आहेत.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आली वाघीण : मेळघाटचे जंगल हे महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्हापर्यंत व्यापलं असून मेळघाटच्या जंगलाचा मोठा भाग हा मध्य प्रदेशात देखील येतो. मध्यप्रदेशातील मेळघाटात असणारी वाघीण सर्वात आधी 2021 मध्ये अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या मेळघाटच्या जंगलात आढळली होती. बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या अंबाबरवा जंगलात देखील तिनं फेरफटका मारला. तापी नदीच्या खोऱ्यातून प्रवास करत तिनं आता सेमाडोह, कोलकास, हरिसाल या भागातून वाहणाऱ्या सीमा नदीच्या परिसरात मुक्काम ठोकला. सात वर्षे वयाची ही वाघीण सेमाडोह जंगल परिसरात जंगल भ्रमंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तलई रायपूर, चौराकुंड, कावळी गेट परिसरात अनेकदा दिसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाघिणीच्या मागे दोन वाघ : सेमाढोह लगतच्या जंगल परिसरात वावरणाऱ्या वाघिणीच्या मागं दोन वाघ या परिसरात डेरा टाकून असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाघिणीचे वय सात वर्षे असून दोन्ही वाघ हे पाच वर्षाचे असल्याचे सांगण्यात येते. अनेकदा सेमाडोच्या जंगलात एकाच वेळी दोन वाघांचं दर्शन देखील अनेकांना घडलं आहे.

तीन मार्चला देखील याच परिसरात दिसला वाघ : आता दोन चार दिवसांपूर्वी पर्यटकांना सेमाडोह च्या जंगलात वाघ दिसला असतानाच तीन मार्चला देखील या जंगल परिसरात अमरावती शहरातील रहिवासी प्रा डॉक्टर हेमंत खडके आपल्या कुटुंबासह जंगल सफारीसाठी आले असताना त्यांना देखील वाघाचं दर्शन घडलं. मेळघाटात वाघांचं दर्शन हे दुर्लभ मानलं जाते. 1973 मध्ये घोषित झालेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक लाख छत्तीस हजार 96 km² परिसरात व्याप्त आहे. यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वाण वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य असं क्षेत्र आहे.

उन्हाळा असल्यामुळे दिसत आहेत वाघ : मेळघाटचे जंगल हे पानगळी असल्यामुळे उन्हाळ्यात मेळघाटचं जंगल हे उजाड झालेले असते. मेळघाटातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी उन्हाळ्यात आटत असल्यामुळे पाण्याच्या शोधात वाघ घनदाट जंगलातून बाहेर येतात. यामुळे सध्या मेळघाटात अनेकदा वाघाचे दर्शन घडत असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा

  1. बछड्यांच्या रक्षणासाठी 'ती 'चे नर बिबटला समर्पण; अमरावती लगतच्या जंगलातील दृश्य, पाहा व्हिडिओ
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार

Last Updated : Jun 8, 2024, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.