ETV Bharat / state

वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित

Melghat Tourism : भर उन्हात बहुतांश झाडांची पानगळ होते. मात्र असं असलं तरी अमरावतीच्या मेळघाट सध्या विविध रंगीबेरंगी फुलांनी बहरल्याचं पाहायला मिळतंय. यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतं आहेत.

भर उन्हात पानगळीतही लाल, जांभळ्या, गुलाबी, फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 7:29 AM IST

फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित

अमरावती Melghat Tourism : पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नजरेत भरणारा हिरवागार मेळघाट उन्हाळ्यात झाडांच्या पानगळीमुळे रुक्ष आणि ओसाड वाटायला लागतो. असं असलं तरी निसर्गानं रखरखत्या उन्हातदेखील लाल, जांभळ्या, गुलाबी अशा विविधरंगी फुलांद्वारे आगळं-वेगळं सौंदर्य मेळघाटला बहाल केलंय. सध्या मेळघाटातील ही रंगीबेरंगी फुलं उन्हाच्या चटक्यातदेखील पर्यटकांना आनंद देत आहेत.

कोणती झाडं बहरली विविध रंगी फुलांनी : सातपुडा पर्वतरांगेतील उंच डोंगर किंवा खोल दऱ्यांच्या भागात असलेल्या सागवानसह अनेक झाडांची पानगळ झाली. त्यामुळे सध्या संपूर्ण मेळघाटाचं जंगल उजाड झाल्यासारखं भासतंय. असं असताना जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेलं गुलमोहर, सुंदर पांढऱ्या रंगाची फुल असणारं साजड यांची पानगळ झाली असली तरी लाल, पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी अशा अनेक रंगाचं मिश्रण आणि त्यासोबतच सुहासिक सुगंधासह मेळघाटात कुंभीची सुंदर फुलंदेखील निसर्गप्रेमींसह पर्यटकांना मोहित करणारी आहेत. जांभळ्या रंगाची करवी, गडद लाल रंग असणारं पांगराची फुलं, लाल रंगाची शालमली आणि पळसाची सुंदर अशी लाल फुलंदेखील डोळ्यात भरणारी आहेत.

मधमाशा आणि कीटकांसाठी निसर्गानं केली व्यवस्था : पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घनदाट असणाऱ्या हिरव्यागार जंगलात मधमाशा, फुलपाखरु आणि कीटकांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. मात्र उन्हाळ्यात पर्णहीन झाडांच्या जंगलात मधमाशा, फुलपाखरं आणि कीटकांना खाद्य उपलब्ध व्हावं यासाठीच निसर्गानं उन्हाळ्यातदेखील या जंगलांमध्ये विविधरंगी फुलांची व्यवस्था केली असल्याचं निसर्ग मित्र यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. मेळघाटात विविध फुल सध्या बहरली आहेत. या फुलांमधील मकरंद खाण्यात मेळघाटातील मधमाशा, फुलपाखरं आणि सर्व प्रकारचे कीटक व्यग्र असल्याचं निसर्ग मित्र यादव तरटे म्हणाले.

मेळघाटात आनंदाचा वसंत : मराठी वर्षाचा शेवटचा महिना असणाऱ्या फाल्गुन आणि वर्षाचा पहिला महिना असणाऱ्या चैत्र या दरम्यान येणारा वसंत ऋतू हा नवचैतन्य घेऊन येणारा ऋतू म्हणून ओळखला जातो. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. तर अनेक झाडही सुगंधीत आणि रंगीत फुलांनी बहरतात. मेळघाटात वसंत ऋतूचा आनंद या भागातील आदिवासी बांधव अतिशय उत्साहात साजरा करतात. वसंत ऋतूत येणारा होळीचा सण हा आदिवासी बांधवांसाठी दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा असतो. यामुळंच विविधरंगी फुलांनी बहरलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधव कामानिमित्त देशभर कुठेही असले तरी होळीच्या निमित्तानं आपल्या घरी परततात. निसर्गातील विविध रंगीत फुलांचा रंग तयार करुन आदिवासी बांधव नैसर्गिक रंगाद्वारे रंगोत्सव साजरा करतात.

हेही वाचा :

  1. अंधश्रद्धेला 'मूठमाती' ! 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा
  2. अमरावतीतील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना 'या' तारखेपर्यंत होणार पूर्ण; महिन्याला 180 रेल्वे वॅगन तयार करण्याची क्षमता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.