ETV Bharat / state

वाघ समोर आल्यानंतर भीती नव्हे आनंद, 160 पर्यटकांनी घेतला व्याघ्रगणना अनुभव - buddha purnima - BUDDHA PURNIMA

tadoba tiger reserv : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये व्याघ्र गणना केली जाते. यावर्षीदेखील निसर्ग प्रेमीयांना या गणनेत सहभागी होता आले. याकरिता एकूण १५५ मचाणींची व्यवस्था करण्यात आली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 10:11 AM IST

चंद्रपूर tadoba tiger reserv : वाघ समोर आल्यानंतर अनेकांची भीतीनं गाळण उडते. मात्र, निसर्गप्रेमींसाठी वाघांना पाहणं हा अनुभव आनंददायी ठरला.

बुद्ध पौर्णिमेचा दिवस निसर्गप्रेमींकरिता खास ठरला आहे. दरवर्षी निसर्गप्रेमी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात दरवर्षी ताडोबा-अधांरी प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये व्याघ्रगणना केली जातेय. यंदाही निसर्गप्रेमी याचा अनुभव घेत आहेत. याकरता ताडोबा अंधारी व्यार्घ्र प्रकल्पान यासाठी सज्ज झाले. 'निसर्ग अनुभव' या नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. यंदा एकूण 155 मचाणीवर वन्यजीवांची गणना करण्यात येणार आहे. यामध्ये बफर क्षेत्रातील 79 आणि कोअर क्षेत्रातील 76 मचाणींचा समावेश आहे. बफर क्षेत्रामध्ये 79 मचाणी वरून 160 पर्यटक प्राणी गणनेचा आनंद घेणार आहेत.

इग्रंजाच्या काळापासून परंपरा सुरु : ताडोबा अंधारी प्रकल्प हा व्याघ्रदर्शनासाठी ओळखला जातो. सफारीच्या माध्यमातून जंगलात भ्रमंती घडवली जाते. यादरम्यान अनेकांना वाघाचे दर्शन होते. मात्र जशी सफरीची मौज आहे तसा मचाणीवर बसून रात्री आजूबाजूच्या वन्यजीवांचे दर्शन घेणे यातही एक वेगळा आनंद असतो. मात्र, हे फक्त बुद्ध पौर्णिमेला शक्य होते. कारण याच काळात चंद्राचा सर्वात लख्ख उजेड असतो. यात रात्री देखील प्राणी दिसू शकतात. ही परंपरा इंग्रजांचा काळापासून आजतागायत सुरू आहे. याच वेळी वाघ आणि बिबट्या प्राण्यांची गणना केली जाते. याचे साक्षी होण्यासाठी देशभरातून वन्यजीवप्रेमी आपली वर्णी लावत असतात. ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत. बफरममध्ये 79 मचाणी वरून 160 पर्यटक प्राणी गणना निसर्गानुभव घेणार आहेत. तर कोअर मध्ये 75 मचाणींचा अधिकारी स्वत:च प्राणी गणना करणार आहे.

सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणना पार : गुरूवारी (23 मे) ला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. यानिसर्गानुभवाकरीता ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देण्यात आले. त्यामध्ये 295 पर्यटनप्रेमींनी बुकींग केली असून त्यापैकी 160 पर्यटनप्रेमींना प्रत्यक्ष प्राणी गणनेची संधी मिळाली आहे. प्राणीगणना पाणवट्याजवळ किंवा पाण्याच्या ठिकाणी केली जाते.

12 तास प्रगणना : बफरझोनमध्ये 79 मचाणी उभारण्यात आल्या आहेत. मचाणी लोखंडी तयार करण्यात आलेल्या आहेत. एका मचाणीवर दोन व्यक्ती बसून त्यामध्ये एक पर्यटनप्रेमी आणि एक वनविभागाचे गाईड राहतील. प्रगणनेकरीता आवश्यक साहित्य वनविभागाचे वतीने पुरविले आहे. ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी 6 रेंजमध्ये ही प्रगणना होईल. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त औपचारिकता असते. प्रत्यक्ष प्राण्यांची संख्या आणि याच्या संख्येचा फारसा संबंध नसतो. कारण व्याघ्रगणनेच्या अनेक प्रगत पद्धती आता आहेत. मात्र, या माध्यमातून सामान्य लोकांना रात्रीचा हा अनुभव घेता येतो. उन्हाळ्यात जंगलातील छोटे पाणवठे आटून जातात. काही मोजक्या पाणवठ्यावर पाणी असते. अशावेळी या पाणवठ्यावर सर्वात जास्त प्राणी येण्याची शक्यता असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.