ETV Bharat / state

बिस्किट खायला गेला अन् आई-वडिलांचा एकुलता एक आयुष हरपला; वाचा नेमकं काय घडलं - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Thane Crime News : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बिस्कीट बनवणाऱ्या मशीनचा बेल्ट गळ्याला लागून वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना अंबरनाथ आनंद नगर भागात घडली.

Thane Crime News
तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 8:24 PM IST

Updated : Sep 3, 2024, 8:46 PM IST

ठाणे Thane Crime News : अंबरनाथमध्ये बिस्किट कंपनीमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. अंबरनाथ आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसी मधील एकाकंपनीत ही दुर्घटना घडली. बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनमध्ये अडकून या मुलाचा मृत्यू झाला. आयुष चौहान असं मृत चिमुरड्याचं नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.

असा घडला अपघात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व येथील आनंद नगर एमआयडीसीजवळील ठाकूर पाडा परिसरातील एका चाळीत आयुष त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील असून त्याची आई पूजा कुमारी नितेश चौहान (वय 22) एका बिस्किट कंपनीत 5 ते 6 कामगारांना जेवणाचा डब्बा पुरवते. नेहमीप्रमाणे आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी त्या आपल्या मुलाला घेऊन बिस्किट कंपनीत डब्बा देण्यासाठी गेल्या. याच दरम्यान मशीनच्या बेल्टवरून बिस्किट एका मागून एक जात असतानाच त्यातील एक बिस्कीट उचलण्यासाठी आयुष्य तिथं गेला. या मशिनच्या बेल्टमध्ये अडकून तो गंभीर जखमी होतो.

तपास सुरू : दरम्यान, ही घटना पाहताच कंपनीच्या कामगारांनी मशीन बंद करून मुलाला उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू होतो. आयुष हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत म्हणाले, मृत मुलाची आई कंपनीतील कामगारांना जेवणाचा डबा पुरवते. घटनेच्या दिवशी मृत मुलगा तिच्यासोबत कंपनीत गेला होता. चालत्या मशीनच्या बेल्टमधून बिस्किटं उचलत असताना हा अपघात झाला. आई पूजा कुमारी चौहान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

  1. इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai crime
  2. पालघर हादरलं! हातपाय बांधलेल्या अवस्थेत नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह, मुलगी बेपत्ता - Palghar Crime News
  3. दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident

Last Updated : Sep 3, 2024, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.