ETV Bharat / state

Borivali Building Collapsed : बोरिवलीत १६ व्या मजल्याच्या पायाड्यावरून पडून तिघांचा मृत्यू... - Borivali Building Collapsed

Borivali Building Collapsed : बोरिवलीमधील (Borivali News) कल्पना चावला चौकात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची पायाडं (परांची) कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. बोरिवली पश्चिमेकडील सोनी वाडी परिसरात ही दुर्घटना घडली.

Borivali Building Collapsed :
बोरिवलीत इमारत कोसळली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 4:53 PM IST

Updated : Mar 12, 2024, 5:25 PM IST

प्रतिक्रिया देताना DCP आनंद भोईते

मुंबई Borivali Building Collapsed : बोरिवली (Borivali News) पश्चिमेकडील एका इमारतीचं सोळाव्या मजल्यावरील पायाडं कोसळून तिघांचा मृत्यू (Three Worker Died) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल : घटनेची माहिती मिळताच, बोरीवली पोलीस (Borivali Police) आणि अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मनोरंजन समाज (वय 42), शंकर वैद्य (25), पियुश हरदार (38) अशी मृतांची नावं आहेत, तर सुशील गुप्ता (35) याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास सुरू आहे.

काय आहे घटना : बोरिवली पश्चिमेकडील कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथे 24 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान आज दुपारी 16 व्या मजल्याचं पायाडं (परांची) अचानक कोसळलं. यात चार कामगार जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तीन कामगारांना मृत घोषित करण्यात आलं. तर चौथ्या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

बाल्कनीचा काही भाग कोसळून दोघींचा मृत्यू : या आधीही अशीच एक घटना घडली होती. विलेपार्ले गावठाण येथील इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून पाच जण जखमी झाल्याची घटना घडली होती. यात दोन जणांचा मृत्यू देखील झाला होता. प्रिशिला मिसाईटा (६५ वर्षे) आणि रॉबी मिसाईटा (७० वर्षे) या दोघींचा मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी कपूर रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. Dombivli Building Collapse : तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
  2. Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत दोन मजली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू
  3. Mathura House Wall Collapse: मंदिराजवळील इमारतीची भिंत कोसळल्याने 5 भाविकांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Last Updated : Mar 12, 2024, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.