ETV Bharat / state

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली ; एका नागरिकाचा मृत्यू एक गंभीर, मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश - Building Collapse In New Mumbai - BUILDING COLLAPSE IN NEW MUMBAI

Building Collapse In New Mumbai : नवी मुंबई परिसरात असलेल्या शहाबाज गावात तीन मजली अनाधिकृत इमारत कोसळली आहे. या इमारत कोसळल्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Building Collapse In New Mumbai
नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 7:48 AM IST

Updated : Jul 27, 2024, 12:52 PM IST

नवी मुंबई Building Collapse In New Mumbai : जुनी तीन मजली अनाधिकृत इमारत कोसळल्यानं नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील बेलापूरजवळील शाहाबाज गावात ही घटना शनिवारी पहाटे घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. या इमारतीत तब्बल 26 कुटुंब राहत असून इमारत कोसळली तेव्हा दोन नागरिक आत अडकले होते. अग्निशमन दलानं या दोन्ही नागरिकांना बाहेर काढलं, मात्र यातील एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पीडितांना तत्काळ मदत देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना दिले.

Building Collapse In New Mumbai
नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली (Reporter)

नवी मुंबईतील तीन मजली इमारत कोसळली : नवी मुंबईतील बेलापूर इथल्या शाहाबाज गावातील 15 ते 16 वर्ष जुनी अनाधिकृत इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. नवी मुंबईतील बेलापूर इथल्या शाहाबाज गावात सेक्टर 19 इथं हनुमान मंदिर जवळ जी+3 ही बिल्डिंग कोसळली आहे. या इमारतीमध्ये दोन नागरिक अडकले होते. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी अग्निशमन दल आणि वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी शोध कार्य करण्यात आलं. अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. अजून कोणी अडकलेलं आहे की, नाही याची खात्री करण्यात आली. तेथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार अजून एक जण आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचाव पथक घटनास्थळी तळ ठोकून होतं. या इमारतीत एकूण 26 कुटुंब राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जखमींना काढलं बाहेर : नवी मुंबईत बेलापूर शाहाबाज गावात 15 वर्षे जुनी अनधिकृत बिल्डिंग कोसळली. बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत शाहाबाज गावातील अनधिकृत इंद्रनिवास ईमारत पहाटे 5.20 वाजता कोसळली. कोसळलेली ईमारत अनधिकृतपणे बांधलेली आणि 15 वर्षेहून अधिक जुनी असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे. ईमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जखमींना काढण्यात नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आलं. इमारत कोसळल्याचं कळताच घटनास्थळी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे, उपायुक्त शरद पवार, वॉर्ड ऑफिसर शशिकांत तांडेल, स्वछता अधिकारी म्हात्रे, उपअभियंता पंढरीनाथ चवडे आणि मनपाचे कर्मचारी तसेच स्थानिक एनआरआय पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले.

हेही वाचा :

  1. ग्रँड रोड इथं इमारतीचा भाग कोसळला; दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू, चार जण जखमी - Building Collapse In Mumbai
  2. सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली : 7 जणांचा मृत्यू, रात्रीपासून बचावकार्य सुरू - Gujarat Building Collapse
  3. कोलकात्तामध्ये बांधकाम सुरू असलेली अवैध इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू

Last Updated : Jul 27, 2024, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.