ETV Bharat / state

तीन ड्रग्ज तस्करांना पुणे पोलिसांकडून अटक, एका नायजेरियन नागरिकासह पुण्यातील दोघांचा समावेश - Pune drug case - PUNE DRUG CASE

Three drug smugglers arrested : फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाउंज (एल3) पार्टी प्रकरणात पोलिसांनी तीन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एका नायजेरीन नागरिकांचा समावेश असून दोन जण पुण्याचे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे.

Three drug smugglers arrested
तीन ड्रग्ज तस्करांना अटक (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 9:49 PM IST

Updated : Jun 28, 2024, 10:03 PM IST

पुणे Three drug smugglers arrested : पुण्यात गेल्या शनिवारी फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाउंज (एल3) बार हॉटेलमध्ये पार्टी झाली होती. या पार्टीत अल्पवयीन मुलांनी ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आज तीन ड्रग्ज तस्करांना पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

संदीप सिंह गिल यांची पत्रकार परिषद (Etv Bharat Reporter)

"23 तारखेला पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील L3 -लिक्विड लिझर लाउंजवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 8 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच दोन जणांना ड्रग्स घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोघांकडं चौकशी करण्यात आली आहे. तेव्हा त्यांनी ड्रग्ज पुरवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यावरून 3 ड्रग्ज तस्करांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. अटक करण्यात ड्रग्ज तस्करांमध्ये एका नायजेरीन व्यक्तीचा समावेश आहे. तसंच या प्रकणातील दोन जण पुण्याचे आहेत". - संदीप सिंह गिल, पोलीस उपायुक्त

पार्टीत ड्रग्ज पुरवल्याची माहिती : यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या तीन ड्रग्ज तस्करांकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. एका आरोपींकडून 75 हजार रुपयांचं कोकेन यावेळी पोलिसांनी हस्तगत केलं आहे. तसंच 12 हजार किमतीची एम.डी. ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या एका ड्रग्ज तस्करानं L3 हॉटेलच्या पार्टीत ड्रग्ज पुरवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असून आणखी माहिती समोर येईल, असं, उपायुक्त गिल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

तीन लाखांचा मद्यसाठा जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील लिक्विड लिझर लाउंज (L3) येथून अवैध दारूसाठा जप्त केला होता. तसंच हॉटेल रेनबोचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं हॉटेल लिक्विड लिझर लाउंजची (L3) तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विना परवाना मद्यसाठा आढळून आला होता. या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत एकूण 241 लिटर विदेशी दारू, इतर साहित्य असा एकूण 3 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच या प्रकणात एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. पुणे ड्रग्ज प्रकरण; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन - Pune Drugs Party Case
  2. पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको; सरकारचं विरोधकांना आवाहन, सीबील स्कोर प्रकरणीही बँकांना दिला इशारा - Devendra Fadnavis on CIBIL Score
  3. पुणे ड्रग्ज प्रकरण; 8 आरोपींना अटक, दोन पोलीस आणि दोन बीट मार्शल निलंबित - Pune Drug Case

Last Updated : Jun 28, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.