ETV Bharat / state

हे पाशवी सरकार, मारकडवाडीतील मतं गेली कुठे? नाना पटोलेंची सरकारवर टीका - NANA PATOLE

सत्ताधाऱ्यांकडे स्पष्ट बहुमत आहे आणि विधानसभा परंपरेनुसार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. मी त्यांचे अभिनंदन केलंय, असंही काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी सांगितलंय.

Nana Patole
नाना पटोले (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 4:54 PM IST

मुंबई - सध्या तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू असून, सोमवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आलीय. आज एकमताने भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांची प्रतिक्रिया समोर येत असून, सत्ताधाऱ्यांकडे स्पष्ट बहुमत आहे आणि विधानसभा परंपरेनुसार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. मी त्यांचे अभिनंदन केलंय, असंही काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी सांगितलंय. आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मारकडवाडीमधील मतं गेली कुठे? : दरम्यान, हे सरकार मतांच्या आधारावर आलेले नाही. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. ते आता सर्व जनतेला माहीत पडलंय. मारकडवाडी गावात ग्रामस्थांनी मतदान केले आणि एका उमेदवाराला दिलेली मतं दुसरीकडे गेलीत. ईव्हीएमच्या विरोधात सध्या ग्रामस्थ आक्रमक झाले असून, तिथे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. काल शरद पवारांनी भेट दिली. मी उद्या किंवा परवा तिकडे जाणार आहे. परंतु तिथली जनता विचारते की, आम्ही केलेले मतदान गेले कुठे? हे पाशवी सरकार आहे आणि यावर सभागृहात सरकारने चर्चा केली पाहिजे, अशी मी मागणी करणार असल्याचंही नाना पटोले म्हणालेत.

समाजवादी पार्टी आमच्यातच : समाजवादी पार्टीतील आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी शनिवारी शपथ घेतली आणि आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहोत, असं वक्तव्य केलंय. यानंतर समाजवादी पार्टी ही भाजपाची बी टीम असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीतून समाजवादी पार्टी बाहेर पडले का? असा प्रश्न नाना पटोलेंना विचारला असता, माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पार्टी ही अजून आमच्यातच आहे. मी त्यांच्या नेत्यांना भेटणार आहे. माझी भेट झाली नाही आणि त्यांची समजूत काढणार आहे. पण सध्या तरी ते समाजवादी आमच्यातच असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

लाडक्या बहिणींची फसवणूक : दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, अशा सर्वांनी अर्ज केले, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीत संतापाचे वातावरण आहे. आमची सरकारने फसवणूक केलीय, असा सवाल लाडक्या बहिणी विचारत आहेत, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, या सरकार 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणींची फसवणूक केलीय. आता सभागृहात त्यांनी लाडक्या भावाला जवळ केलंय, असा टोला नाना पटोलेंनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावलाय.

हेही वाचा-

  1. "विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय..."; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
  2. समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे- आदित्य ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.