ETV Bharat / state

MLA Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब शिंदे गटाच्या वाटेवर; वाचा काय आहे कारण - MLA Anil Parab

MLA Anil Parab : ठाकरे गटाला बसणारे धक्के काही कमी होताना दिसत नाहीत. नुकतीच आमदार रविंद्र वायकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता ठाकरेंचे विश्वासू आमदार अनिल परबही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

आमदार अनिल परब
आमदार अनिल परब
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 4:14 PM IST

Updated : Mar 12, 2024, 4:47 PM IST

मुंबई MLA Anil Parab : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातून इन्कमिंग आणि आउटगोइंग सध्या जोरात सुरू आहे. लोकसभा उमेदवारीचे तिकीट मिळणार नाही. असं चिन्ह दिसल्यानंतर आयाराम-गयाराम यांचं प्रमाण वाढणार आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यानंतर ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी ठाकरे गटाला जी गळती लागली आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाही. नुकतंच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ईडीची भीती दाखवण्या प्रयत्न : परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी शिवसेनेत अनेक पदं भूषवली आहेत. तसंच, त्यांचा चांगला जनसंपर्क असून, प्रशासकीय कामाचा अनुभव देखील दांडगा आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसंच, दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृत पद्धतीने केल्याचा आरोप भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमैया वारंवार करत आहेत. याप्रकरणी परबांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. तसंच, हे प्रकरण अजून कोर्टाच्या अखत्यारीत आहे. दुसरीकडे तपास यंत्रणा आणि ईडीची भीती अनिल परब यांना दाखवली जात आहे. ईडीची भीती दाखवून अनिल परब यांना शिंदे गटात येण्यास भाग पाडलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच अनिल परब यांच्यावर ईडीचा दबाव असल्याचंही बोललं जात आहे.

काँग्रेस आमदार भाई जगतापही शिंदे गटाच्या वाटेवर - एकीकडे भाजपा आणि शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील म्हणजे ठाकरे गट (शिवसेना), काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि नेत हे शिंदे गटात आणि भाजपामध्ये जात आहेत. नुकताच ठाकरे गटाचे (शिवसेना) आमदार रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस आमदार भाई जगताप देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. कारण भाई जगताप यांचा विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपत आहे. काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी पुन्हा आमदारकीची संधी मिळेल की नाही याची खात्री नाही. म्हणून भाई जगताप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

आमदार रवींद्र वायकर शिंदेंसोबत : जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आणि 13 खासदार गेले. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. कालांतराने हळूहळू आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर काही महिन्यांनी आमदार मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे आणि मिनाताई कांबळी या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर नुकतेच आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर जर आता आमदार अनिल परब यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असेल असं राजकीय जाणकार आणि तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

उत्तम संघटनात्मक कार्य : अनिल परब हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करत आहेत. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. तसंच, अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, विश्वासू आणि त्यांच्या जवळचे मानले जातात. पश्चिम उपनगर म्हणजे बांद्रा, सांताक्रूज या विभागात अनिल परब यांनी संघटना मजबूत केली, वाढवली आहे. तसंच, त्यांच्यावर जी संघटनात्मक जबाबदारी दिली होती, ती त्यांनी उत्तरमरित्या पार पाडली. चांगला संघटक अशी अनिल परब यांची ओळख आहे. पण आता ते ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा :

1 Loksabha Election 2024 : "आता आपणच बसू"; जागावाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांचं थेट खर्गेंनाच पत्र

2 लोकसभा निवडणूक 2024: भाजपाच्या 90 उमेदवारांची दुसरी यादी तयार, लवकरच होणार जाहीर ?

3 हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा; नवीन सरकार होणार स्थापन

Last Updated : Mar 12, 2024, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.