ETV Bharat / state

अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, ठाण्यातील ४५ वर्षीय महिलेला ४.३९ कोटीच्या खंडणी वसूली प्रकरणी अटक - Thane Extortion Case

Thane Extortion Case : अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ठाण्यातील ४५ वर्षीय महिलेने पीडित व्यक्तीकडून ४.३९ कोटीच्या खंडणी वसूली केली. ठाण्यातील या घटनेने पोलिसात खळबळ उडाली. अखेर ब्लॅकमेलर महिलेला 1 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात अटक केली.

Thane Extortion Case
फाईल फोटो (etv bharat reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 11:01 PM IST

ठाणे Thane Extortion Case : आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी बँकेत लोन घेण्यासाठी गेलेल्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करीत ३ लाखाचे कर्ज मंजूर करून घेतले. ही घटना फेब्रुवारी २०१७ मधील आहे; मात्र सीईओ निवृत झाल्यानंतर त्यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करीत आरोपी महिलेने ८ कोटीची मागणी केली. दबावापोटी तक्रारदार सीईओ यांनी १०८ हप्त्याद्वारे महिलेला ४.३९ कोटी दिले. आणखीन पैशाची मागणी केल्यानंतर अखेर तक्रारदाराने पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंदविली. अखेर पोलिसांनी सापळा रचून महिलेला १ लाख स्वीकारताना मंगळवारी (ता. १८ जून) रोजी अटक केली.

महिलेची तक्रारदाराशी लगट : तक्रारदार (६६) वर्षीय सेवानिवृत को ऑपरेटीव्ह बँकेत सीईओ पदावर असताना आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी सन २०१६ रोजी त्यांच्या संपर्कात आलेल्या आरोपी महिलेने बँकेच्या वडाळा येथे तक्रारदारची भेट घेतली. त्यांनी लोनची प्रक्रिया सुरू केली. महिलेने दिलेली कागदपत्रे अपुरी असल्याने तिला कर्ज देणे अडचणीचे होते. म्हणून तक्रारदाराने सर्व्हे केला. यात महिलेने ठाण्याच्या आनंदनगर कोपरी येथील घराची कागदपत्र दिली होती. तेव्हा पडताळणी करण्यासाठी तक्रारदार यांनी २०१७ मध्ये महिलेच्या कोपरीच्या घरी भेट दिली. तेव्हा महिलेने तक्रारदार यांना लगट करीत तक्रारदाराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केली.

अश्लील फोटो पाठवून धमकविले : त्यानंतर महिलेने तत्कालीन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सीईओ यांच्याकडून ३ लाखाचे महिन्याला ७ हजार ५०० रुपयांचा हप्ता असे कर्ज मंजूर करून घेतले. याचाच फायदा उचलत एका महिन्यांनंतर महिलेने तक्रारदाराला कोंडीत पकडून अश्लील फोटो त्याच्या आणि त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या व्हाट्सअपवर पाठविण्याची धमकी देत ८ कोटीची मागणी केली. दबावामुळे आणि अब्रू जाईल म्हणून तक्रारदाराने २०१७ ते २०२३ या दरम्यान महिलेला पाच लाख रुपयांचे १०८ हप्त्यात ४ कोटी ३९ हजार रुपये दिले. पैशांची व्यवस्था तक्रारदार यांनी फ्लॅट विकून तसेच त्यांच्या प्रोव्हीडंड फंडातून किंवा अन्य ठिकाणाहून कर्ज घेऊन दिले; मात्र महिलेची भूख वाढतच गेली आणि तक्रारदार हे उध्वस्त झाले. महिलेने आता तक्रारदारला ५ लाखाची मागणी केली. पैशाची व्यवस्था नसल्यान तक्रारदार यांनी नाईलाजास्तव पोलिसांशी संपर्क केला. तेव्हा पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रारदाराने महिलेला संपर्क करून पाच लाख नाही १ लाख रुपये देण्याबाबत संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (ता. १८ जून) रोजी एक लाख रुपये घेताना रंगेहात अटक केली.

हेही वाचा:

  1. लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha
  2. "नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार"; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका, सेतूची केली पाहणी - Nana Patole on Atal Setu
  3. कोणी मैदान देतं का मैदान? मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण; पोलीस भरती ढकलली पुढं - Maharashtra Police Recruitment

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.