ETV Bharat / state

विप्रो कंपनीच्या कर्मचाऱ्याला फोनवरून बोलावत रस्त्यातच चाकू भोसकून हत्या; नेमकं काय घडलं? - Thane crime News - THANE CRIME NEWS

crime News: अंबरनाथच्या ऑर्डन्स फॅक्टरी परिसरात अंबर चौकामध्ये एका 25 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले आहेत.

Thane crime News
Thane crime News (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 10:41 AM IST

ठाणे Thane crime News : विप्रो कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाची भर रस्त्यातच चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथच्या ऑर्डन्स फॅक्टरी परिसरात असलेल्या अंबर चौकात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेल्या आरोपींचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सचिन भोसले असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

25 वर्षीय तरुणाची भर रस्त्यातच चाकू भोसकून हत्या (Source - ETV BHARAT Reporter)

भर रस्त्यातच चाकूनं वार : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सचिन भोसले हा अंबरनाथ शहरातील जावसाई गावात कुटूंबासह एका भाड्याच्या घरात राहत होता. तो अविवाहित असून नवी मुंबई येथील विप्रो कंपनीत म्हणून कार्यरत होता. 23 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सचिन घरी जेवण करत असताना त्याला कोणीतरी त्याच्या मोबाईलवर कॉल करून भेटण्यासाठी बोलवत होतं. त्यामुळं मृत सचिन हा रात्रीचं जेवण केल्यानंतर दहाच्या वाजल्याच्या सुमारास दुचाकीनं घरून निघाला होता. सचिन अंबर चौकात आला असता तिथं अज्ञात आरोपींनी त्याला भर रस्त्यातच गाठलं. त्याच्यावर धारदार चाकूनं वार केले. या चाकू हल्ल्यात सचिनच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडुन तपास सुरू : घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. दुसरीकडे स्थानिक अंबरनाथ पोलीस पथकासह उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींचा समांतर तपास सुरू केला आहे. या संदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी किशोर शिंदे म्हणाले, सचिनच्या घरापासून घटनास्थळ 500 मीटर अंतरावर आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्येचा अंदाज : सचिनची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हत्या करणारे मारेकरी कोण? सचिन अंबर चौकात कोणासोबत आला होता? त्याचा कोणासोबत वाद होता का? याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करत आहे.

हेही वाचा

  1. फोर्ब्सच्या एकाच वर्षीच्या यादीत क्षितिजा वडतकर-वानखेडे यांनी पटकाविलं दोनवेळा स्थान, यशाचा सांगितला 'हा' मंत्र - FORBES INDIA LEGAL POWERLIST
  2. NEET पेपर लिक प्रकरण; मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी, तर शिक्षकाला ठोकल्या बेड्या, NEET प्रकरणात लातूर कनेक्शन - NEET Exam Paper Leak Case
  3. महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case
  4. व्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का करत नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न - Encroachment On Footpaths

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.