ETV Bharat / state

इन्स्टाग्रामवर 'गे' म्हणल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, मोडले नाकाचे हाड - BEATING FRIEND ON INSTAGRAM comment - BEATING FRIEND ON INSTAGRAM COMMENT

Instagram Friend Beating : इंस्टाग्रामवर 'गे' म्हणल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकणात पाच जणाविरोंधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Instagram Friend Beating
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:30 AM IST

ठाणे Instagram Friend Beating : इन्स्टाग्राम मित्र असलेल्या एका तरुणाला पाच जणांच्या टवाळखोर टोळक्यानं जबर मारहाण करण्यात आली आहे. 'गे' म्हणल्याचा जाब विचारण्यासाठी हा तरुण गेला होता. ही घटना कल्याण पश्चिम भागातील हायप्रोफाईल भागातील वसंत व्हॅली परिसरात असलेल्या एका शाळेसमोर घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पाच हल्लेखोर तरुणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विराज पुरोहित (रा. चिखले बाग, कल्याण), आदित्य रमाने, अंकेश मिश्रा, ईशांत जाधव (तिघेही रा. वसंत व्हॅली ), अप्पा असं गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावं आहेत.

टोळक्याची जबर मारहाण : पोलीस सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पियूष हा कल्याण पश्चिम भागातील मल्हार संकुलमध्ये कुटूंबासह राहतो. त्यातच तरुणाला गुन्हा दाखल असलेले आरोपी 'गे' म्हणून चिडवत होते. या कमेंट पाहून जखमी पियुष संतापला. त्यानंतर पियूषनं कमेंट करणाऱ्या टवाळखोर तरुणांना कल्याण पश्चिम भागातील हायप्रोफाईल भागात असलेल्या वसंत व्हॅली परिसरातील एका शाळे समोर 7 मे रोजी दुपारच्या सुमारास गाठत जाब विचारला. हा जाब विचारताच पियुषला टवाळखोर टोळक्यानं जबर मारहाण केलीय. यावेळी हल्लखोर विराज पुरोहित, आदित्य रमाने, अंकेश मिश्रा, ईशांत जाधव, अप्पा या पाच तरुणांनी पियुषला मारणहाण केली. या मारहाणीत पियुषच्या नाकाचे हाड फॅक्चर होऊन त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळं जखमी पियुषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपींचा शोध सुरू : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, " जखमी पियुषच्या 45 वर्षीय आईच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या पाच टवाळखोर तरुणांच्या विरोधात विविध कलमानुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरिक्षक एस. व्ही. वाघमोडे करीत असून पाचही आरोपीचा शोध सुरू आहे."

हे वाचलंत का :

  1. ठाण्यात कापड दुकानात राडा; मात्र पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
  2. पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाली परेड; पाहा व्हिडिओ - Criminal Identification Parade
  3. शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रकरण आलं समोर - Teacher Beaten Student Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.