ETV Bharat / state

"सदाभाऊ खोताच्या बापाने...;" शरद पवारांवरील टीकेवरून संजय राऊत संतापले; म्हणाले...

खोताच्या बापाने म्हणजेच मोदींनीही शरद पवार आपले कसे गुरू आहेत वारंवार सांगितलंय, पवारांचं बोट पकडून कसं राजकारण केलं हे मोदींनी सांगितल्याची आठवणही राऊतांनी करून दिलीय.

Sanjay Raut
संजय राऊत संतापले (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई- रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक टीका केलीय. शरद पवार नेहमीच सांगतात त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, त्यांना महाराष्ट्राचा चेहरा त्यांच्यासारखा करायचाय का? अशी टीका खोतांनी केली होती. त्यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोतांना खडे बोल सुनावलेत. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार देशाचे सर्वोच्च नेते आहेत, सदाभाऊ खोताच्या बापाने म्हणजेच नरेंद्र मोदींनीही शरद पवार हे आपले कसे गुरू आहेत हे वारंवार सांगितलंय, शरद पवारांचं बोट पकडून कसं राजकारण केलं हे मोदींनी सांगितल्याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिलीय.

देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा: ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने शरद पवार यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अन् कृषी क्षेत्रातील कामाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. पवार साहेबांनी काहीच केलं नाही, असं म्हणणाऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. तसेच त्यांनी पवार साहेबांच्या कामाचा लेखाजोखा माहिती करून घेतला पाहिजे. शरद पवार देशाच्या राजकारणातले भीष्म पितामह असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या आजारपणावर अशा पद्धतीनं बोलून तुम्ही महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घातलीय, अशा लायकीची माणसं फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केल्याचं म्हणत संजय राऊतांनी सदाभाऊ खोतांवर टीकास्त्र डागलंय. तसेच सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा असल्याचीही टीका संजय राऊतांनी केलीय.

नेमकं प्रकरण काय?: पडळकरांच्या प्रचारसभेसाठी काल देवेंद्र फडणवीस सांगलीत गेले होते. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोतसुद्धा होते. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना शरद पवारांवर खालच्या पातळीची टीका केली. शरद पवार आता म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, त्यांना महाराष्ट्राचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत म्हणालेत. विशेष म्हणजे सदाभाऊ खोतांच्या टीकेवर अजित पवारही भडकलेत. तसेच मिटकरी यांनी "बोलणारा अन् हसणारा दोघांनाही लक्षात ठेवतो आहोत. तूर्तास इतकेच...!" अशी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलीय.

हेही वाचा-

  1. घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश
  2. उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.