ETV Bharat / state

राज्यात एकही आमदार नसलेल्या रामदास आठवलेंचा अजब दावा; म्हणाले, ...तर मीच मुख्यमंत्री होणार - Ramdas Athawale

Ramdas Athawale : राज्यातील विधानसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून दोघांमध्ये शीतयुद्ध अनुभवायला मिळत आहे. याविषयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, यांचा वाद मिटला नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार.

Ramdas Athawale
रामदास आठवले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 6:24 PM IST

पुणे Ramdas Athawale : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दीक संघर्ष पाहायला मिळत आहे. काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी थेट इशारा देत एक तर राजकारणात मी राहील किंवा फडणवीस राहतील असं म्हटलं आहे. पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, यांचा वाद मिटला नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार.

रामदास आठवले हे मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना (ETV Bharat Reporter)

रामदास आठवले पुरस्काराने सन्मानित : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव आणि रामदास आठवले यांना हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

'त्यासाठी' पंतप्रधानांशी चर्चा करणार : यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची जी मागणी होत आहे त्याबाबत आठवले म्हणाले की, ही जी मागणी होत आहे त्याबाबत पत्र केंद्रीय मंत्री अमित शाह यांना देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी आहे. या दोघांचही मोठं योगदान आहे. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून राज्य सरकारच्यावतीनं ही मागणी केली पाहिजे, असं देखील सांगणार आहे. राज्य सरकारची शिफारस आल्यानंतरच भारतरत्न बाबत विचार होत असतो. त्यामुळे राज्य सरकारने शिफारस करावी.

आरक्षण वर्गीकरणाबाबत मातंग समाजाच्या मागणीचा विचार व्हावा : सुप्रीम कोर्टाकडून आज एसटी आणि ओबीसी उपवर्गीकरण बाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, उपवर्गीकरण बाबत मातंग समाजाची मोठी मागणी आहे. त्याबाबत राज्य सरकारने विचार करावा. यावेळी बोलताना वायनाडमध्ये जी घटना घडली आहे त्याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, वायनाडबाबत केंद्राने राज्य सरकारला सूचना केल्या होत्या; मात्र राज्य सरकारने लक्ष दिलं नाही. राहुल गांधींनी याबाबत लक्ष द्यायला हवं होतं; परंतु राहुल गांधी यांनी अजिबात लक्ष दिलं नाही.

फडणवीस दिल्लीला गेले तरी महाराष्ट्रातच राहणार : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते देवेंद्र फडणीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, या आधी नितीन गडकरी यांचा नंबर लागलेला होता. महाराष्ट्र हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कोणाला तरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा आश्वासक आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे. तसंच देवेंद्र फडणीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजपा अजून मजबूत होईल. फडणवीसांचा भाजपाला चांगला उपयोग होऊ शकतो तसंच फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल.

फडणवीस-ठाकरेंची मैत्री व्हावी ही इच्छा : काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, राजकारणामध्ये दोघेही राहतील; कारण एकानं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझी दोघांनाही विनंती आहे की, राजकारणामध्ये दोघांनी राहायला हवं. दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही. एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं तर ते कदाचित बाहेर आले नसते. एकनाथ शिंदे हे स्वतः आमच्या सोबत आलेले आहेत; त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं ही जी चीड उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे त्यांनी ती काढून टाकावी. फडणवीस आणि ठाकरे या दोघांची मैत्री होती. ती पुन्हा एकदा मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं यावेळी आठवले म्हणाले.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस होणार भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष ? काय आहेत निवडीमागची समीकरणं, काय म्हणाले भाजपातील नेते ? - Devendra Fadnavis
  2. "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar'
  3. मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.