ETV Bharat / state

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निकाल ठाकरे गटाच्या जिव्हारी; घेतला 'हा' मोठा निर्णय - Vinayak Raut defeat - VINAYAK RAUT DEFEAT

Vinayak Raut Defeat : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळं निकालाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अमोल किर्तीकर, विनायक राऊत या दोन्ही उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडं याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी दिली.

Vinayak Raut
विनायक राऊत (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 6:52 PM IST

मुंबई Vinayak Raut Defeat : मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांनी केवळ 48 मतांनी पराभव केलाय. कोकणात रत्नागिरी मतदारसंघात विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी पराभव केलाय. हे दोन्ही पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागले आहेत. आता या दोन्ही उमेदवारांसाठी ठाकरे गटानं निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर निर्णय आल्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असं ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सांगितलं. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय घडलं, हे मी ऐकलं. 'त्या' संदर्भातही आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशारा यापूर्वीच दिला आहे.

कोकणात पराभव : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे यांना 4लाख 48 हजार 514 मते मिळाली असून विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली आहेत. नारायण राणें यांचा 47 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. 2014 तसंच 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते. त्यामुळं ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडं त्यांना रोखण्यासाठी भाजपानं नारायण राणेंना मैदानात उतरवलं होतं. 2009 मध्ये नारायण राणे यांचे मोठे चिंरजीवर निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनाचे संयुक्त उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा 1.78 लाख मतांच्या फरकानं पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तेव्हा, राऊतांनी त्यांचा 1 लाख 50 हजार 51 मतांनी पराभव केला होता. त्यामुळं या मतदारसंघातील निवडणुकीत संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. म्हणून आम्ही त्याविरोधात निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. तिथं समाधान न झाल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections
  2. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस लागले कामाला; निवडणुकीसाठी कसली कंबर - Devendra Fadnavis
  3. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र तसंच एनटीएकडून मागितलं उत्तर - NEET UG 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.