ETV Bharat / state

BJP ShivSena Differences : लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाण्यात महायुतीमध्ये तणाव; अजित पवार गट, भाजपा, शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 4:51 PM IST

BJP ShivSena Differences : लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपा आणि शिंदे गटात मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपाला डावलले जात असल्याचा आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केलेला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

BJP ShivSena Differences
शिवसेना शिंदे गट

पवार गट, भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आपसी वादावर बोलताना नेते

ठाणे BJP ShivSena Differences : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे थेट मुख्यमंत्र्यांना कल्याण लोकसभा निवडणुकीवरून इशारा देत आहेत. दुसरीकडे भाजपाला ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून सतत डावलले जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे शहरातील महिलांना टीएमटीमध्ये 50 टक्क्यांनी सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळावा, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ठाणे स्थानकात या सेवेचा शुभारंभ करताना संजय केळकर यांना मात्र आमंत्रणही पाठविण्यात आलेलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

सहनशीलतेला देखील एक मर्यादा असते : भाजपाला नेहमी शिवसेनेने डावलले आहे. मोदीजी यांचे नाव घ्यायचे आणि भाजपा पक्षाला कमी लेखायचे याबाबत भाजपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. यामुळे भविष्यात जुने ताणलेले संबंध लगेच सुधारणार नाही हे संजय केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. ठाण्यातील भाजपा हतबल नाही आणि असा अपमान आता सहनही करणार नाही, असा इशारा देत केळकरांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच अंगावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

आम्ही महायुती धर्म पाळणार-नरेश म्हस्के : महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्याचा कार्यक्रम आमच्या पक्षाचा होता. त्यासाठी भाजपाने नाराज होऊ नये, मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव शिंदेंच्या शिवसेनेचे समन्वयक नरेश म्हस्के यांनी केली आहे. एवढचं नाही तर कोणताही उमेदवार असला तरीही शिवसेना म्हणून आपण काम करणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी जाहीर केलं आहे.

ठाण्यातच नाराजी : ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशा उघड नाराजीचे देखील महायुतीतील वितुष्ट समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये मागील अनेक वर्षांचे तणावाचे संबंध देखील समोर आहेत. यावरून भविष्यात महविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी जाहीर झाली तरी निवडणूक सोपी जाणार नाही असं चित्र उभं राहिलं आहे.

हेही वाचा :

  1. Arvind Kejriwal on CAA: पाकिस्तानमधील जनतेसाठी भारताचा पैसा वापरण्यात येणार, सीएएवरून केजरीवाल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
  2. Hyderabad Liberation Day: केंद्राला मराठवाड्याचा विसर? 17 सप्टेंबर 'हैदराबाद मुक्ती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय
  3. Nashik Loksabha Constituency: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना, खासदार श्रीकांत शिंदेंकडून थेट 'या' खासदाराची उमेदवारी जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.