ETV Bharat / state

सर्वेक्षणासाठी शिक्षक रस्त्यावर तर शाळेत मुले वाऱ्यावर, तरी सर्वेक्षणात अनंत अडचणी - Teachers Problem In Survey

Teachers Problem In Survey: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जातीनिहाय सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, हे कर्तव्य बजावताना शिक्षकाना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे 10वी, 12वीच्या परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्यानं सर्वेक्षणाच्या कामामुळे सराव परीक्षा न घेता त्या रद्द करण्याची नामुष्की शाळांवर ओढावली आहे. जाणून घेऊया शिक्षकांची वाताहत

Teachers Problem In Survey
तरी सर्वेक्षणात अनंत अडचणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 9:19 PM IST

जातिनिहाय सर्वेक्षणात शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्येविषयी माहिती देताना मुख्याध्यापिका

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Teachers Problem In Survey : शहरातील वार्डनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी जवळपास दोन ते तीन हजार शिक्षक सर्वेक्षणासाठी घरोघरी जात आहेत; मात्र त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. (Caste wise Survey) कारण बहुतांश शाळेतील पूर्ण शिक्षक कामासाठी बोलवण्यात आले असल्यानं फक्त मुख्याध्यापकांना सर्व काम करावं लागत आहे. इतकंच नाही तर २६ जानेवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करायची कशी? असा प्रश्न शाळांना पडलाय. (Difficulties in Caste wise Survey)

शिक्षक करताहेत अडचणींचा सामना: जे शिक्षक सर्वेक्षणासाठी जात आहेत त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. काही लोक आम्हाला आरक्षणाची गरज नाही म्हणून घराबाहेरूनच त्यांना हाकलून देतात, तर काही ठिकाणी मोबाईलमध्ये दिलेले ॲप काम करत नसल्यानं त्रास होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी शासनाकडे केल्या आहेत.

शाळेतील सर्व शिक्षक सर्वेक्षणाला गेले: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारनं जातीनिहाय सर्वेक्षण सुरू केलं आहे. सर्वेक्षणाचं काम शिक्षकांना करायला सांगितलं असून अगदी कमी वेळात हे काम पूर्ण करायचं असल्यानं सर्व शाळातील शिक्षकांना कामावर बोलवण्यात आलं आहे. काही शाळातील ९९% तर काही शाळांमधील ९०% इतके शिक्षक सर्वेक्षणाच्या कामासाठी गेले आहेत. परिणामी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.

सराव परीक्षा रद्द करण्याची नामुष्की: दहावी आणि बारावी या वर्गाच्या महत्त्वाच्या अशा टप्प्यात विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली असताना, सराव परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. बारावी वर्गाच्या सराव परीक्षा रद्द करण्यात आल्या असून दहावीच्या सराव परीक्षा कशाबशा शिक्षकांनी उरकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिक्षक शाळेत नसल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं मत शिक्षक संघटनाचे नेते वाल्मिक सुरसे यांनी मांडलं.

सर्वेक्षण करणं झालं अवघड: गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह राज्यात वेगवेगळ्या भागात शिक्षक जातीय सर्वेक्षण करत आहेत. मात्र, हे करत असताना मोबाईलमध्ये दिलेले ॲप काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ॲप उघडल्यावर त्यात माहिती संकलित होत नाही तर दुसरीकडे माहिती जमा करताना देण्यात आलेले पर्याय काही ठिकाणी चुकीचे असल्याने नागरिक सर्वेक्षण करताना वाद घालत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. काही ठिकाणी आम्हाला आरक्षणाची गरज नाही किंवा आम्ही आधीच आरक्षण घेत आहोत असं म्हणून गेलेल्या शिक्षकांना घराबाहेरूनच हाकलून देण्याचे प्रकार वाढले आहेत.

ॲपच्या समस्येमुळे शिक्षक हैराण : काही ठिकाणी सर्वेक्षण करताना ॲप उघडत नाही आणि जर सुरू झाले तर त्यात एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी किमान एक तास एवढा कालावधी लागत आहे. त्यामुळे यात योग्य तो मार्ग काढून सर्वेक्षण पूर्ण करावं अशी विनंती शिशु विकास शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कुलकर्णी यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. कांद्याचे दर घसरले; सोलापूर मार्केट यार्डात दोन हजार गाड्या भरून कांद्याची आवक
  2. मराठा समाज आक्रमक; उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे
  3. ताडोबा क्षेत्रात वाघानं केलं स्वच्छता कर्मचाऱ्याला ठार; निमढेला प्रवेशद्वाराजवळील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.