ETV Bharat / state

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा ! 12 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील चित्रफीत दाखवून शिक्षकानं केली लगट : पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Teacher Abused Girls In Thane - TEACHER ABUSED GIRLS IN THANE

Teacher Abused Girls In Thane : शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानंच 12 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

Teacher Abused Girls In Thane
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 10:18 AM IST

ठाणे Teacher Abused Girls In Thane : बदलापूरची घटना ताजी असतानाच त्यानंतर अकोल्यातही 8 वीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली. आता पुन्हा गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका महापालिका शाळेत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे नराधम शिक्षकानं पीडित विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवून लगट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात 40 वर्षीय आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

12 वर्षीय विद्यार्थिनीला दाखवली अश्लील चित्रफीत : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 12 वर्षीय मुलगी भिवंडी शहरातील महापालिकेच्या एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याच शाळेतील तिच्या वर्गात 40 वर्षीय नराधम शिक्षकाला अश्लील चित्रफीत पाहण्याची सवय जडली. त्यामुळे तो शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींना शाळेतच अश्लील चित्रफित दाखवून विद्यार्थिनींना केळी आणि मोसंबी आणून ती फळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फिरवून लगट करत त्यांचा विनयभंग करत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईनं आज 28 ऑगस्ट रोजी दिली आहे. तर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असतानाही मुली शाळेत जात नसल्यानं याची विचारणा पालकांनी केल्यानं हा विनयभंगाच्या अश्लीलतेचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या : एका पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीनं तिच्या आईला शिक्षकाकडून घडलेल्या प्रकाराचं कथन केल्यानंतर नराधम शिक्षकाच्या अश्लीलतेला बिंग फुटलं. त्यानंतर आईनं शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन 28 ऑगस्ट रोजी नराधम शिक्षकाविरोधात बीएसएन 2023 चे कलम 74, 351 (2) सह पोक्सोचं कलम 12 प्रमाणं गुन्हा दाखल केला. दुसरीकडं पीडितेच्या पालकांकडून सदर प्रकाराची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सरफराज खान यांना मिळाल्यानं त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस पथकानं शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याला तातडीनं अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली, या नराधम शिक्षकाला 29 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News
  2. धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl
  3. बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.