पुणे : सरहद, पुणे आयोजित 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' (Marathi Sahitya Sammelan) २०, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी 'तालकटोरा स्टेडिअम, दिल्ली' येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका डॉ. तारा भवाळकर (Tara Bhawalkar) यांची एकमतानं निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली.
दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी बैठक पार पडली. या बैठकीस साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, आदी उपस्थित होते. हे मराठी साहित्य संमेलन २०, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडिअम दिल्ली येथे होणार आहे. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. तर संमेलनाचं उद्घाटन दुपारी चार वाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
कोण आहेत डॉ. तारा भवाळकर? : डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने त्या वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा -