ETV Bharat / state

'जीवदया' पांजरापोळ गोशाळेत 2100 जनावरांचं संगोपन; दररोज लागतोय पंधरा टन चारा - Jivdaya Mandal Panjarapol Goshala

Jivdaya Mandal Panjarapol Goshala : आजच्या काळात शेतीत नैसर्गिक संकटे आणि खर्च अधिक. त्या तुलनेत नफा अगदी कमी अशी स्थिती असताना, चार पाच जनावरे सांभाळणं देखील कठीण आहे. अशा दुष्काळातही वेल्हाळे (ता.संगमनेर) येथील 'जीवदया' पांजरापोळ गोशाळेत लहान-मोठ्या 2100 जनावरांचं संगोपन करण्यात येतय.

Goshala Story
गोशाळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 7:12 PM IST

जीवदया पांजरापोळमध्ये २१०० जनावरांचे होते संगोपन

शिर्डी (अहमदनगर) Jivdaya Mandal Panjarapol Goshala : एरव्ही आपल्याला एक ते दोन जनावरं सांभाळायची म्हटली तरी, त्या जनावरांना दररोज चारा, पाणी याची तजवीज करणं अवघड वाटतं. त्यात दररोजचं हे काम करावं लागतं म्हटल्यावर पुरते वैतागून जातो. मात्र, भीषण दुष्काळातही वेल्हाळे (ता.संगमनेर) येथील 'जीवदया' पांजरापोळ गोशाळेत लहान-मोठ्या 2100 जनावरांचं लहान मुलांसारखं संगोपन केलं जात आहे. तेथे गेल्यावर उत्तम व्यवस्थापनाचाही अनुभव येतो.

इतक्या जनावरांचे होतेय संगोपन : संगमनेर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर वेल्हाळे परिसरात असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी सात एकर क्षेत्रात श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत 'जीवदया पांजरापोळ' (गोशाळा) आहे. याठिकाणी लहान-मोठी 1500 गोवंश जनावरे आहेत. त्यात घोडे, म्हशी यांचाही समावेश, 600 शेळ्या, 40 मेंढ्याही आहेत. कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलीस पकडून ती पांजरापोळ गोशाळेत आणून सोडली जातात. नगरसह नाशिक जिल्ह्यातून जनावरे येथे सोडली जात आहेत. तर शेतकर्‍यांकडं चारा नसल्यानं शेतकरीही जनावरे आणून सोडत आहेत.

अशी घेतात काळजी : सध्या भीषण दुष्काळ असताना पांजरापोळ गोशाळेत सर्व जनावरांची अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगार काळजी घेतात. या सर्व जनावरांना दररोज पंधरा टन चारा लागतो. यामध्ये गवत, मका, वाढे, ऊस, भुसा असा चारा दिला जात आहे. दोन शेततळ्यांच्या माध्यमातून जनावरांची तहान भागवली जात आहे. या सर्व जनावरांची देखभाल करण्यासाठी बारा कामगार काम करतात. जनावरे आजारी पडली तरी त्यांची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यासाठी दवाखाना आणि औषधालय उभारलं आहे. डॉक्टरांकडून जनावरांची नियमित तपासणी केली जाते.

जनावरांसाठी हक्काचं घर : याचबरोबर समाजातील दानशूर लोकही आपापल्या पद्धतीनं मदत करत असतात. त्यावरच संपूर्ण खर्च भागवला जातो. या संपूर्ण सात एकरच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर आहे. याच परिसरात भुसा साठवण्यासाठी मोठे गोडाऊन बांधण्यात आले. वाढदिवस आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी मनोरे, खेळण्यांसह उद्यान तयार केलं आहे. त्यामुळं नियमित येथे पर्यटकांचाही वावर पाहायला मिळतो. अत्यंत काटकसरीनं जनावरांचं संगोपन करताना त्यांच्या आदर्श व्यवस्थापनाचं दर्शन इथं घडतं. त्यामुळं आवर्जुन भेट द्यावी अशी ही गोशाळा जनावरांसाठी हक्काचं घर ठरलं आहे.

गोशाळेला कुठलेच अनुदान नाही : सध्या पांजरापोळ गोशाळेमध्ये लहान- मोठ्या जवळपास 2100 जनावरांचं संगोपन केलं जातय. त्यांना चाराही मोठ्या प्रमाणात लागत आहे. मात्र, यासाठी कुठलंच अनुदान मिळत नाही. त्यामुळं समाजातील दानशूरांनी मदत करणं गरजेचं असल्याचं जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष, राजेश दोशी यांनी सांगितलं. हिंदू परंपरेत गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळं जनावरे विकू नये. उलट आपण गोवंशासह इतरही जनावरांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करावं किंवा जनावरे पांजरापोळमध्ये आणून सोडावीत. या ठिकाणी जनावरांची अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जात असल्याचं, जीवदया पांजरापोळ व्यवस्थापक सचिन यंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा न करता सरकारचा अधिवेशनातून पळ - विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
  2. दुष्काळी मदत मुख्यमंत्री शुक्रवारी करणार जाहीर, मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती
  3. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, दिल्ली दरबारी सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.