ETV Bharat / state

टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातची बस का? हा महाराष्ट्राचा अपमान... , मिरवणूक बसवरून विरोधकांची टीका - Nana Patole On Cricketer Bus - NANA PATOLE ON CRICKETER BUS

Nana Patole On Cricketer Bus : टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज मायदेशात दाखल झालाय. राज्य सरकारनं भारतीय संघाच्या स्वागतासाठी गुजरातमधून बस आणून महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

Cricketer Bus
टीम इंडिया मिरवणूक बस (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 4:55 PM IST

मुंबई Nana Patole On Cricketer Bus : भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल तेरा वर्षानंतर विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला आहे. 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे अंतिम चुरशीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावानी पराभव केला. त्यामुळं देशात विजयाचा जल्लोष अजूनही सुरू आहे. दरम्यान, आज भारतीय टीमचे मुंबईत आगमन होत आहे. मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) असे विश्वविजेता खेळाडूंची मिरवणूक काढून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. ज्या बसमधून खेळाडूंचे मिरवणूक काढण्यात येणार आहे. ती बस गुजरातमधून मागवण्यात आल्यामुळं विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

बेस्टची सोय करायला हवी होती : 2007 रोजी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-ट्वेंटी वर्ल्डकप भारताने जिंकला होता. त्यावेळी खुल्या बसमधून भारतीय संघाशी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, आता जी बस मागवली ती गुजरातमधून मागवली आहे. मात्र मिरवणुकीसाठी मुंबईची बेस्ट बस वापरायला हवी होती.

हा महाराष्ट्राचा अपमान : मुंबई आणि बेस्ट बसेस यांची एक वेगळी ओळख आहे. बेस्ट बस वापरली असती तर आम्हाला आणखी आनंद झाला असता, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र सरकार गुजरात धार्जिणे आहे. त्यांनी टीम इंडियासाठी गुजरातवरून बस का आणली आहे. तिकडून बस आणणे याचा अर्थ महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखं आहे. अशी टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. कांगारुंविरुद्ध आठ धावांनी शतक हुकल्यानंतरही रोहितचं नाबाद 'द्विशतक'; ढगाळ वातावरणात पाडला विक्रमांचा 'पाऊस' - rohit sharma
  2. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या 4 मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार व्हावा, आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी - MLA Pratap Sarnaik
  3. 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल; आज मुंबईत निघणार भव्य विजयी मिरवणूक, 'हे' रस्ते असणार बंद! - Team India Victory Rally

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.