ETV Bharat / state

महिला अत्याचारावरुन उबाठा गटाचे आंदोलन; स्वप्ना पाटकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाल्या दादा या बहिणीची कशी मदत करणार ? - Swapna Patkar On Uddhav Thackeray - SWAPNA PATKAR ON UDDHAV THACKERAY

Swapna Patkar On Sanjay Raut : उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या विरोधात बंद आयोजित केला होता. मात्र उच्च न्यायालयानं चपराक लगावल्यानं बंद मागं घेऊन महाविकास आघाडीनं राज्यभर आंदोलन केलं. आता या प्रकरणी पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांनी छळ केल्याच्या प्रकरणात तुम्ही या बहिणीची काय मदत करणार आहात, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

Swapna Patkar On Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 6:01 PM IST

मुंबई Swapna Patkar On Uddhav Thackeray : बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आल्यानंतर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेबाबत आंदोलन केलं. यानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आल्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबत उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी न्यायाची अपेक्षा केली असून त्या वाट बघत असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.

संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढं करत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंद संदर्भात उच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी तो बंद मागं घेतला. परंतु राज्यभर महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं करण्यात आली. यामध्ये उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले. या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2022 ला स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली. त्या क्लिपमध्ये संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला. या सर्व प्रकरणाची स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना आठवण करुन दिली. संजय राऊत हे त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं वागले आहेत, त्यावर बोला, असं स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

Swapna Patkar On Uddhav Thackeray
स्वप्ना पाटकर (Reporter)

या बहिणीसाठी तुम्ही काय करणार? : स्वप्ना पाटकर या सिनेमा दिग्दर्शिका तसेच मानसोपचार तज्ज्ञ असून त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुद्धा आहे. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असंही नमूद केलं आहे की, "संजय राऊत हे त्यांचा पाठलाग करायचे आणि त्यांना तसेच इतर कोणासोबत काम करू देणार नाही, असंही धमकवायचे. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले. कारण नसताना त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बोलावलं जायचं. त्यांचा एक चित्रपट "डॉक्टर रखूमाई" सुद्धा संजय राऊत यांनी रिलीज होऊ दिला नाही. त्याकरता त्यांचं आणि त्यांच्या कलाकारांचं प्रचंड नुकसान झालं. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना त्यादरम्यान अनेकदा शिवीगाळ केली असून धमक्या सुद्धा दिल्या आहेत. परंतु अशाच शिवसैनिकाच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दिली. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं स्वप्ना पाटकर यांची वाट लावली तसेच त्यांनी पक्षाची वाट लावली आहे. तुम्ही बहिणीसाठी लढताय, तर या बहिणीसाठी तुम्ही काय करणार? ते महाराष्ट्राला सांगा, मी वाट बघत आहे," असंही स्वप्ना पाटकर यांनी पत्रात लिहिलं आहे.

Swapna Patkar On Uddhav Thackeray
खासदार संजय राऊत (Reporter)

हेही वाचा :

  1. संजय राऊत प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा स्वप्ना पाटकर यांना धमकीचा फोन - डॉ. नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe PC Mumbai
  2. Patra Chawl Scam : 'जास्त फडफड करु नको'; पत्राचाळ घोटाळ्याच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या घरावर फेकलं धमकीचं पत्र
  3. Patra Chawl Scam Case : संजय राऊतांनी बेहिशेबी रक्कम गुंतवली चित्रपट आणि मद्य कंपनीत; स्वप्ना पाटकर यांची ईडीला माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.