ETV Bharat / state

राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? राज्यव्यापी बैठकीत 'स्वाभिमानी' करणार विचारमंथन - Swabhimani Shetkari Sanghtana - SWABHIMANI SHETKARI SANGHTANA

Swabhimani Shetkari Sanghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी 22 आणि 23 जून रोजी बारामतीत राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक पार पडणार आहे. ही माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे. जाणून घ्या, या बैठकीचं कारण.

Swabhimani Shetkari Sanghtana state level meeting on 22nd and 23rd june in Baramati
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 7:24 AM IST

पुणे Swabhimani Shetkari Sanghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी (16 जून) ऑनलाईन माध्यमातून घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत लोकसभेतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. तसंच भविष्यकालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची आणि राजकीय भूमिका काय असणार? यावर विचार मंथन करण्यासाठी 22 आणि 23 जूनला बारामतीत राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Source reporter)

काय म्हणाले संदीप जगताप? : माध्यमांशी संवाद साधत असताना संदीप जगताप म्हणाले की, "राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात गेली 25 वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करत आहे. राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऊस दरामध्ये मोठा फायदा झाला. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना दोन वेळेस खासदार केलं. परंतु, याच शेतकऱ्यांनी राजू शेट्टींचा सलग दोनदा पराभवदेखील केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आज प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी लढत असताना, या निवडणुकीत राजू शेट्टींसह राज्यात स्वाभिमानीच्या उभ्या असणाऱ्या उमेदवारांना पराभव का बघावा लागला? आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होतात. स्वाभिमानीमुळं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. मग तेच सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या वेळेस स्वाभिमानीला का बाजूला ठेवतात? यावर व्यापक चर्चा व्हावी. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जनमताचा कौल लक्षात घेऊन नवी राजकीय भूमिका घ्यावी, यावर विचारमंथन करण्यासाठी बारामती येथे 22 आणि 23 जूनला दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक होणार आहे."

स्वाभिमानीनं विरोध केल्यास निवडून येणं कठीण : पुढं ते म्हणाले की, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र चालण्याची भूमिका होती. कुठल्याही आघाडीत न जाता देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चार ते पाच लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद दिसून आली. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळं अनेक अनपेक्षित निकाल लागले. संपूर्ण राज्याचा विचार केला तर किमान 40 विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निर्णायक मतदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यांच्या बाजूनं उभी राहील ती आघाडी तिथं विजयी होऊ शकते. स्वाभिमानीनं विरोध केल्यास तिथं निवडून येणं अवघड आहे. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कोल्हापूर जिल्ह्यानं मागील विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. स्वाभिमानी विरोधात असल्यामुळं एकही भाजपाचा आमदार कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आला नाही. यामुळं लोकसभेत पराभव झाला असला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी झाली असं म्हणता येणार नाही."

स्वाभिमानीचे मावळे खचलेले नाहीत : "लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींच्या पराभवानं आम्ही दुःखी झालो असलो तरी स्वाभिमानीचे मावळे खचलेले नाहीत. संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक अशी ताकद आहे. राजू शेट्टींच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनांबद्दल जनतेमध्ये प्रचंड आदर आहे. त्यामुळं बारामतीत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत आम्ही सखोल विचारमंथन करणार आहोत. नव्या जोमानं विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. मला खात्री आहे की, येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किमान 15 आमदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभेत दिसतील," असा विश्वासही यावेळी जगताप यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. का झालं राजू शेट्टींचं 'डिपॉझिट' जप्त; पराभवानंतर शेट्टींची भावनिक पोस्ट - Hatkanangale Lok Sabha results
  2. "तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास..."; राजू शेट्टींनी व्यक्त केला लोकसभा विजयाचा विश्वास - Lok Sabha Election 2024
  3. उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला, ते माझ्यामुळेच नेते झालेत -राजू शेट्टी - Raju Shetty

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.