ETV Bharat / state

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर आधीच संशय, जेवणावरून उकरून काढला वाद अन् केली हत्या - Wife Murder Case Mumbai - WIFE MURDER CASE MUMBAI

Wife Murder Case Mumbai : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईतील मलबार हिल परिसरात काल (5 मे) रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी पत्नीच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे.

Wife Murder Case Mumbai
हत्याकांड (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 9:45 PM IST

मुंबई Wife Murder Case Mumbai : मलबार हिल परिसरातील शिमला नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अजय वर्धम (वय ३८) याने पत्नी अंजली अजय वर्धम (वय ३६) हिचा चाकूने भोसकून राहत्या घरी हत्या केली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात मृत अंजली वर्धम यांचा भाऊ अशोक नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३४, ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

जेवणावरून भांडण केले अन् केली हत्या : काल रात्री १० वाजताच्या सुमारास रात्रीचे जेवण जेवत असताना अजय वर्धम याने अंजलीसोबत जेवणावरून भांडण उकरून काढले. त्यानंतर भांडणाचे पर्यवसन हत्येत झाले आहे. भांडण झाले त्यावेळी आरोपी अजय वर्धम याने मद्य प्राशन केले होते, अशी माहिती अंजलीची चुलत बहीण शलाका पाटील यांनी दिली आहे. काल शनिवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान तक्रारदार अशोक नलावडे यांनी त्यांच्या बहिणीचा पती अजय शशिकांत वर्धम याने बहीण अंजली वर्धम हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला चाकूने भोसकून तिची निर्घृण हत्या केली असल्याची पोलिसांना माहिती दिली.

अंजलीला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी केले मृत घोषित : हत्या झाल्यानंतर अंजली हीचा थोरला मुलगा जवळच राहणाऱ्या मामाला म्हणजेच अशोक नलावडेला बोलावला गेला. त्यावेळी तात्काळ अशोक नलावडे घटनास्थळी पोहोचले. तेथे रक्तबंबाळ अवस्थेत अंजली जमिनीवर कोसळलेल्या होत्या आणि तिच्या डाव्या छातीवर चाकूने भोकसल्याचे दिसत होते. बेशुद्ध अवस्थेत अंजलीला भाऊ अशोक नलावडे याने भाटिया रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत महिलेचे रक्त पुसले आणि कपडेही बदलले: याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अजय वर्धमच्या आईला अटक केली आहे. आई आणि मुलाने आपापसात संगनमत करून जखमी अंजलीचे घरातील पडलेले रक्त कपड्यांनी पुसून तसेच तिचे कपडे बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून फिर्यादी अशोक नलावडे यांनी अजय शशिकांत वर्धम आणि मयत महिला हिची सासू आशा उर्फ सरस्वती वर्धम यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपी पती फरार असून त्याला अटक करण्यासाठी मलबार हिल पोलिसांनी पथकं स्थापन केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. तर 'एमआयएम' पुण्यात 'टिपू सुल्तान'चे स्मारक उभारणार, भाजपा-हिंदुत्ववादी संघटना खडबडून जाग्या - Tipu Sultan Memorial Issue
  2. वर्षा गायकवाड, अनिल देसाई यांच्यात छुपा समझोता, विकास कामामुळं विजय होणार - राहुल शेवाळे - Anil Desai vs Rahul Shewale
  3. लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'साताऱ्याची निवडणूक...' - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.