ETV Bharat / state

'नातवाचे प्रताप' आजोबांनाही भोवणार, सुरेंद्र अग्रवाल यांचीही चौकशी, सुपारी दिल्याचा आहे आरोप - Pune Porsche Accident Case

Surendra Agarwal : पुणे हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची आज (23 मे) पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही पुणे पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत.

Surendra Agarwal
सुरेंद्र अग्रवाल (REporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 6:45 PM IST

Updated : May 23, 2024, 7:44 PM IST

पुणे Surendra Agarwal : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाला काल (22 मे) बाल न्याय मंडळाने 14 दिवसांची बालसुधार कक्षात रवानगी केली. तसंच वडील विशाल अग्रवाल यांना काल कोर्टात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. यानंतर आज त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी बोलावून त्यांची चौकशी केली.

सुरेंद्र अग्रवाल त्यांचे मत मांडताना (REoporter)

पुणे पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांची देखील चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांची एक खास टीम तयार केली जाणार आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणे, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीने केल्याबद्दल, अल्पवयीन तरुणाला वीआयपी सेवा प्रकरणी ही चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

यासाठी छोटा राजनची मदत घेतली : ब्रह्मा बिल्डर्सचे मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं होतं. आता पुणे पोलिसांकडून कल्याणी नगर येथील अपघाताबाबत सुरेंद्र कुमार यांची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

'या' कारणामुळे पोलीस कोठडी : उल्लेखनिय बाब म्हणजे पुणे हिट अंँड रन प्रकरणी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी कालच स्पष्ट केलंय की,, ज्या कारणावरून जामीन मागितला जात होता ते कारण आता लक्षात घेतलं जाणार नसल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. जे वडील आरोपी आहेत त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही. जेव्हा गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि आपल्या मुलाकडे लायसेन्स नाही हे माहीत असताना देखील वडील अग्रवाल यांनी गाडी चालवायला दिली. तसंच आपल्या मुलाचं वय 18 वर्षे पूर्ण झालेलं नसताना देखील पबमध्ये पाठवलं. हे चांगल्या पालकांचं लक्षण नाही. म्हणून कोर्टानं अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

पालक म्हणून त्यांचं अपयश : अ‍ॅड. असीम सरोदे पुढे म्हणाले की, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी पुण्यातील सगळ्यांचे जीव धोक्यात आहेत. एखाद्या श्रीमंताकडून अपघात झाला तर त्याला काहीही होत नाही ही जी न्यायाची असमानता आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही कोर्टात देखील लेखी स्वरूपात दिलं आहे की, आरोपीकडे जर लायसेन्स नसेल आणि तो 18 वर्षांखालील असेल आणि त्याला दारू पिण्यासाठी पबमध्ये पाठवण्यात येत असेल तर पालक म्हणून त्यांचं अपयश आहे. एवढे दिवस कार खरेदी करूनही रजिस्ट्रेशन का केलं नाही याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. तसंच त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही. तसंच या प्रकरणात दोन 'एफआयआर' असणं हे खूपच चुकीचं आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शवविच्छेदन अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी - Salman khan house firing case
  2. धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या बचाव कार्यासाठी गेलेल्या एसडीआरफची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू - Pravara River SDRF Boat
  3. उजनी जलशायात बेपत्ता झालेल्या सहा जणांचे सापडले मृतदेह, नातेवाईकांचा आक्रोश - Ujani Jalshaya

Last Updated : May 23, 2024, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.