पुणे : राज्यासह पुणे शहरात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आज (8 ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या वतीनं पुण्यातील अलका चौक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मागील आठवड्यात पुण्यातील बोपदेव घाट येथे एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली. मात्र, जवळपास एक आठवडा झाला तरी या घटनेतील आरोपी सापडलेले नाही. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना थांबत नाहीये. याला सरकारचं निष्क्रिय काम हे जबाबदार आहे. जोपर्यंत बोपदेव घाटातील मुलीला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांच्या मनात वर्दीची भीतीच राहिलेली नाही." तसंच आता राज्यातील सरकार बदलण्याची वेळ आली असून या राज्यात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. हे सर्व रोखण्यासाठी या सरकारला हद्दपार करावं लागणार असल्याचंही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा -
- महिला अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी पुण्यात अनोखा फॅशन शो; पाहा व्हिडिओ - Awareness Against Women Oppression
- जळगाव हादरलं! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन डोकं दगडानं ठेचलं; 'नराधमाला फाशी द्या' संतप्त जमावाची मागणी - Minor Girl Rape Murder Case
- हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Supriya Sule