ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या बॅनरवर रोहित पवारांचा फोटोच नाही, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... - Supriya Sule On Sharad Pawar - SUPRIYA SULE ON SHARAD PAWAR

Supriya Sule On Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटातर्फे राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे; मात्र राष्ट्रवादीच्या बॅनरवर आमदार रोहित पवार यांचा फोटो नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडली की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच नेता आहे. ते म्हणजे शरद पवार."

Supriya Sule On Sharad Pawar
सुप्रिया सुळे आणि शरद पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 5:48 PM IST

पुणे Supriya Sule On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीनं कालपासून (9 ऑगस्ट) शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या बॅनरवर आमदार रोहित पवार यांचा फोटो नसल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी सुरू झाली की काय? अशी चर्चा सुरू असताना याबाबत पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच नेता आहे. ते म्हणजे शरद पवार. त्यामुळे आमचे कोणाचे फोटो असू दे किंवा नसू दे काहीही फरक पडत नाही."

सुप्रिया सुळे या अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना (ETV Bharat Reporter)

फडणवीसांच्या रडगाऱ्हाण्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत मांडलं. मला सर्वच राजकीय पक्षांकडून टार्गेट केलं जातं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "त्यांचं म्हणणं बरोबर आहे. 60 वर्ष त्यांनी पवार साहेबांच्या बाबतीत हेच केलं आहे आणि आता देखील ते तेच करत आहेत."

योजनांचे निर्णय कसे होतात हे ठाऊकच - सुळे : "लाडकी बहीण योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर महायुतीला मतदान करा", असं काल अजित पवार म्हणाले. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "चुनावी जुमला असून 'इतना तो हक बनता है.' आज आपण पाहिलं तर अनेक योजना अशा आहेत की, ज्या काँग्रेसनं सुरू केल्या असून त्या पुढे अशाच सुरू आहेत. मला आश्चर्य वाटलं की, अनेकांनी अनेक वर्ष प्रशासनात काम केलं आहे. यामुळे योजनांचे निर्णय कसे होतात सगळ्यांना माहीत आहे."

त्याशिवाय हेडलाईन होत नाही : लोकसभेच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा, अशी टीका केली होती. यावर अजित पवार यांनी मोदींना शरद पवारांवर टीका करू नका, असं सांगितलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "त्यांच्यात काय बोलणं झालं हे मला माहीत नाही. पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही." तसंच वक्फ बोर्डबाबत सुळे म्हणाल्या, "आम्ही काल याबाबत आमचं वक्तव्य मांडल होतं. बिल आणू नका म्हणून आम्ही विरोध केला होता. आता मोदी सरकार नाही. ते एनडीए सरकार आहे. अजित पवारांच्या पक्षाचं वक्फ बोर्डावर काय मत आहे ते कळलं नाही."

हेही वाचा:

  1. "माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis
  2. मनीष सिसोदिया दाखल होण्यापूर्वीच बदल्यांचा धडाका; दिल्ली शिक्षण विभागातील 100 मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या - Delhi Education Department Transfer
  3. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? "मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी..."- भाजपाची टीका - UDDHAV THACKERAY DELHI VISIT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.