ETV Bharat / state

आम्ही बारामतीची जागा मागितली, सुनेत्रा वहिनींनी निवडणूक लढविण्याकरिता कार्यकर्त्यांचा आग्रह-सुनील तटकरे - सुनील तटकरे

Sunil Tatkare on Sunetra Pawar : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लढत होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार आहेत का? या प्रश्नावर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी जागा वाटपाबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

NCP state president Sunil Tatkare
सुनील तटकरे स्पष्टच बोलले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 10:16 PM IST

सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्‌यावर बोलताना सुनील तटकरे

पुणे Sunil Tatkare on Sunetra Pawar : ''सुनेत्रा पवार या गेली अनेक वर्षे काम करत आहेत. जागा वाटपानंतर सगळं ठरेल. आम्ही बारामतीची जागा मागितली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलं नाही. ज्यावेळी बसू, त्यावेळी सगळं ठरेल. सुनेत्रा वहिनींनी निवडणूक लढवावी, असं समस्त बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेचं म्हणणं आहे. कार्यकर्त्यांचा आग्र आहे.'', अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले तटकरे? अजित पवार यांनी बारामतीत बोलताना ''मी दिलेला लोकसभेचा उमेदवार निवडून दिला नाही तर मी तुम्हाला विधानसभेला थांबणार नाही'', असं म्हटलं होतं. ''ते भावनिक ब्लॅकमेलिंग नाही का?'' असं विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले की, ''दादांची शैली दादांची आहे. त्याची तुलना कोणी करू नये. महाराष्ट्राला दादांची पद्धत माहीत आहे. ते साधारणपणे बेधडक चर्चा करतात.''

युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय: ''युगेंद्र पवार हे बारामतीत सक्रिय होत आहेत. माझ्या 40 वर्षांच्या राजकारणात या अगोदर मी कधी त्यांना पाहिलं नाही. माझा भाऊसुद्धा 2019 पासून माझ्यासोबत नाही. परंतु, पुढे काय होईल ते सांगता येत नाही. हा राजकारणाचा बालिशपणा चालू आहे. नैराश्यातून आलेली ही सगळी घटना आहे. समोरच्या व्यक्तींना निराशा आली आहे. त्यामुळे ते असा प्रयोग करत असतात'', असं सुनील तटकरे बोलले.

हा तर राजकारणातला बालिशपणा: ''पुणे लोकसभेत पार्थ पवाराच्या नावाने सर्वे झाला असल्याचं बोललं जात आहे. हे एकदम चुकीचं आहे. मी अगदी खरं सांगतो आमचा कुठलाही सर्वे झाला नाही. सर्वे होतच असतात. पण, पार्थ पवार यांच्या नावानं नाही. हा सगळा राजकारणातला बालिशपणा चालू आहे. रोहित पवारसुद्धा हे बालिशपणा करत आहेत. त्यांच्याकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं'' सुनील तटकरे यांनी सांगितलं.

  • महायुतीतील जागावाटप चर्चेनंतरच: ''महायुतीचं लोकसभेचं जागा वाटप आणखी ठरलेलं नाही. ते सर्वत्र चर्चा करून विशेष म्हणजे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून ठरणार आहे. सगळी चर्चा वरिष्ठ स्तरावर थोड्या दिवसात होईल आणि युतीचे ठरेल,'' असे संकेत सुनील तटकरे यांनी दिले.

    हेही वाचा:
  1. अजित पवारांच्या विरोधात पुतण्या राजकीय मैदानात, प्रथमच राजकारणातील प्रवेशावर मांडली स्पष्ट भूमिका
  2. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेपी नड्डा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर, नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र
  3. शिरूर लोकसभा मतदार संघात रंगणार तिरंगी लढत; जागा वाटपाच्या शक्यतेवरून संभाव्य उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.