ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत स्वराज्याच्या बालेकिल्ल्याचा काय आहे इतिहास; अनंत गिते आणि सुनिल तटकरेंमध्ये होणार लढत - Raigad Lok Sabha Constituency - RAIGAD LOK SABHA CONSTITUENCY

Raigad Lok Sabha Constituency : रायगड लोकसभा मतदार संघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 4 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदार संघाचा रायगड लोकसभा मतदार संघात समावेश होतो. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते अनंत गिते यांच्यात लढत होणार आहे.

Raigad Lok Sabha Constituency
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 3:51 PM IST

Updated : Apr 22, 2024, 7:29 AM IST

रायगड Raigad Lok Sabha Constituency : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड या किल्ल्याची डागडुजी करुन 1674 साली स्वराज्याची राजधानी रायगड केली. ठाणे जिल्ह्यातून कुलाबा वेगळं करुन 1869 ला रायगड हा जिल्हा करण्यात आला. रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या आगामी लोकसभेत रायगड लोकसभा मतदार संघातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. रायगड जिल्हा सध्या मावळ आणि रायगड अशा दोन मतदार संघात विभागला आहे. त्यामुळे एकेकाळची छत्रपती शिवरायांची राजधानी राहिलेल्या रायगड जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीत कसा प्रभाव पडणार याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Raigad Lok Sabha Constituency
Raigad Lok Sabha Constituency

कोण आहेत आगामी निवडणुकीत उमेदवार : लोकसभा निवडणुकीचं बिगूल आता वाजलं आहे. विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांचा प्रचारही सुरू केला आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुनिल तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे हे विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. सुनिल तटकरे यांनी या अगोदर राज्य मंत्रिमंडळात काम केलं आहे. तर दुसरीकडं शिवसेना उबाठा गटानं अनंत गिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अनंत गिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री म्हणूनही कार्य केलं आहे. त्यामुळे अनंत गिते यांचा विजय निश्चित होईल, असा दावा उबाठाकडून करण्यात येत आहे.

Raigad Lok Sabha Constituency
Raigad Lok Sabha Constituency

2009 च्या निवडणुकीत काय होतं मतदारांचं प्रमाण : रायगड मतदार संघात फुटीपूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. या अगोदर सुनिल तटकरे यांनी या मतदार संघातून बाजी मारली होती. रायगड मतदार संघात मागील तीन निवडणुकीत महिला आणि पुरुष मतदारांचं प्रमाण कसं होतं याबाबत आपण माहिती घेणार आहेत. रायगड लोकसभा मतदार संघात 23 एप्रिल 2009 ला मतदान झालं होतं. यावेळी तब्बल 13 लाख 59 हजार 830 एकूण मतदार होते. यापैकी 6 लाख 43 हजार 257 पुरुष मतदार होते. तर 7 लाख 16 हजार 573 महिला मतदारांची संख्या होती. मात्र या निवडणुकीत 7 लाख 67 हजार 678 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केलं होतं. या निवडणुकीत 7 उमेदवारांनी आपलं भविष्य आजमावलं होतं. मतदानाची टक्केवारी 56.45 टक्के होती.

Raigad Lok Sabha Constituency
Raigad Lok Sabha Constituency

2014 मध्ये काय झाला बदल : देशात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तांतर घडवून आणत सत्तेची सूत्रं आपल्या हाती घेतली. लोकसभा निवडणूक 2014 नं देशात सत्तांतर झालं. यावेळी रायगड लोकसभा निवडणूक 24 एप्रिल 2014 ला पार पडली. या निवडणुकीत रायगड लोकसभा निवडणुकीत 15 लाख 32 हजार 781 मतदार होते. यापैकी 7 लाख 52 हजार 491 पुरुष मतदार होते. तर 7 लाख 80 हजार 290 महिला मतदारांची संख्या होती. यापैकी 9 लाख 88 हजार 192 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केलं होतं. 2009 च्या तुलनेत 2014 मध्ये मतदानाचा टक्का वाढून तो 64.47 टक्क्यांवर गेला होता. तर महिला मतदारांची संख्याही वाढलेली होती. या निवडणुकीत तब्बल 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र प्रत्यक्ष 10 उमेदवारांनी निवडणूक लढवली.

Raigad Lok Sabha Constituency
Raigad Lok Sabha Constituency

शिवसेना आणि राष्ट्रवादीत झाली 2019 ला तुल्यबळ लढत : लोकसभेची 2019 ची निवडणूक 23 एप्रिल 2019 ला झाली होती. शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात तुल्यबळ लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली. या निवडणुकीत सुनिल तटकरे यांनी रायगड मतदार संघात दोन वेळा जिकणाऱ्या अनंत गिते यांचा पराभव केला. यावेळी रायगड मतदार संघात एकूण मतदारांची संख्या 16 लाख 52 हजार 965 इतकी होती. यापैकी 8 लाख 10 हजार 716 पुरुष मतदार होते. तर 8 लाख 42 हजार 246 महिला मतदार संख्या होती. यापैकी 10 लाख 27 हजार 583 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केलं. यावेळी मतदानाची टक्केवारी 56.45 इतकी होती.

काय आहे रायगड मतदार संघाचा इतिहास : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदार संघातही अजित पवार यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उबाठा गटात तुल्यबळ लढत होणार आहे. रागयड लोकसभा मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. रायगड लोकसभा मतदार संघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली आहे. रायगड मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या 4, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश करण्यात आला आहे. पंधरावी लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 या काळात अनंत गिते यांनी रायगडमधून विजय मिळवत खासदार पदावर बाजी मारली होती. त्यानंतर 2019 मध्ये सुनिल तटकरे यांनी अनंत गिते यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे.

हेही वाचा :

  1. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील लढणार, राज्यात वंचितचा कुणाला बसणार फटका ? - Lok Sabha Election 2024
  2. उदयनराजेंवर शरद पवारांची खोचक टीका; म्हणाले, राजाबद्दल आम्ही प्रजेनं काय सांगायचं, त्यांची स्थिती... - lok sabha election 2024
  3. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर, काय आहे साताऱ्यात स्थिती? - udayanraje bhosle

Last Updated : Apr 22, 2024, 7:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.