ETV Bharat / state

मंत्रिपदाबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "संधी मिळाली तर..." - Sunetra Pawar - SUNETRA PAWAR

Sunetra Pawar : राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळालं तर आपण संधीचं सोनं करू, असं मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. पुणे शहरात त्यांचं पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Sunetra Pawar
सुनेत्रा पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 9:54 PM IST

Updated : Jun 14, 2024, 10:43 PM IST

पुणे Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं अजित पवार यांच्या पत्नीला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता पक्षातील कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, जर कोणती संधी असेल तर त्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील आणि जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचं माझे नक्कीच प्रयत्न असणार आहेत.

सुनेत्रा पवार या कार्यकर्त्यांचे आभार मानताना (ETV Bharat Reporter)

सुनेत्रा पवारांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी महायुतीचे सर्वच शहराध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आणि याला सर्वांनी मान्यता दिली. सर्वांचं पाठबळ यासाठी मिळालं. राज्यसभेची खासदार म्हणून निवडून देत असताना पाठिंब्यासाठी आज सर्वांचे आभार मानते. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून हीच माझी उर्जा आणि मला बळ देणारी आहे आणि याच ऊर्जेवर मी पुढे काम करणार आहे."

विकासासाठी जनता बळ देईल : सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, "काम करताना अनेक गोष्टी मी जाणल्या. बारामती मतदारसंघात निवडणूक लढवत असताना एकच ध्येय होतं की, बारामतीसारखा सर्वच विधानसभेत विकास करायचा आहे आणि आता यासाठी मला माझी जनता बळ देणार आहे." बारामतीत झालेल्या पराभवाबाबत सुनेत्रा पवार यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "बारामती निवडणूक पराभवाबाबत आम्ही आत्मपरीक्षण विचारमंथन करू आणि येणाऱ्या निवडणुकीत असं काही होणार नाही, याची नक्कीच काळजी घेऊ."

निलेश लंकेंच्या त्या सत्कारावर का म्हणाल्या सुनेत्रा? : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे यांची भेट घेत सत्कार स्विकारला. याबाबत सुनेत्रा पवार यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "यामागे पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं होतं. सर्वांना ही व्यक्ती कोण होती ते माहीत होतं. परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे."

हेही वाचा :

  1. आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming
  2. सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळायची घाई, तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी - Monsoon Session Period
  3. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections

Last Updated : Jun 14, 2024, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.