पुणे Sunetra Pawar : देशभरात लवकरच लोकसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर राज्याचं नव्हे, तर देशाचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याबाबत अजित पवारांनी देखील चांगलीच तयारी केल्याची चर्चा आता बारामतीकरांमध्ये सुरू आहे. त्यामुळं सेनेत्रा पवार यांचे बॅनर झळकायला आता सुरवात झाली आहे. असच एक बॅनर पुण्यातील कात्रज चौकात भावी खासदार म्हणुन सुनेत्रा पवार यांचं बॅनर लावण्यात आलं आहे.
सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे : कात्रज चौकात आरपीआय सचिन खरात गटाकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील कात्रजमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवार ठरवण्यापूर्वीच बॅनल झळकवल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत. घड्याळ तेच वेळ नवीन म्हणत नवीन खासदार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांनी विविध नेत्यांना भेठीगाठी तसंच विविध कार्यक्रमांना हजेरी द्यायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांची जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय : बारामती लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीचं नेतृत्व सध्या सुप्रिया सुळे तसंच अजित पवार यांच्याकडं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण झालं आहे. सुनेत्रा पवार अलीकडं राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याद्वारे ते बारामतीच्या जनतेला विविध विकासकामांची ओळख करून देताना दिसतात. अर्थात हे सर्व चित्र पाहता सुनेत्रा पवार या लोकसभेच्या उमेदवार असतील, असं मानलं जात आहे.
मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या : सुनेत्रा पवार बारामती परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासोबतच अनेक कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी लागल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे जन्मगाव असलेल्या काटेवाडी येथील कार्यक्रमांनाही सुनेत्रा पवार हजेरी लावताना दिसत आहे. पवार कुटुंबानं काटेवाडीत अनेक विकास काम केली आहेत. तसंच बारामतीचा वेगळी ओळख निर्माण करुण देण्याचं काम पवार कुटुंबानी गेल्या अनेक वर्षापासून केलंय. त्यामुळं काटेवाडीची सून विकासकामांसाठी जनतेच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, असं गावकऱ्यांना वाटतंय.
'हे' वाचलंत का :