नाशिक Good Handwriting Tips : इंटरनेट आणि मोबाईल सारख्या डिजिटल युगात विद्यार्थीना हातानं लिहिण्याची सवय कमी झालीय. त्यामुळं मुलांचं हस्ताक्षर चांगलं व्हावं यासाठी यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये पालक हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती देत आहेत.
कोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळं आता पालक ही मुलांबाबत जागृत झाले आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये खेळासोबतच हस्ताक्षर कार्यशाळेला पसंती देत आहेत. हस्ताक्षर चांगलं असल्यानं स्वतःचं वेगळेपण सिद्ध होते. पण हस्ताक्षरामुळं संयम आणि जगण्यात शिस्तही लागते. जन्मतः हस्ताक्षर कोणाचंही चांगलं नसतं. चांगलं हस्ताक्षर हवं असेल तर सराव हाच एक पर्याय आहे. पेन आणि पेन्सिलच्या साहाय्यानं सरळ, वक्राकार, गोलाकार अक्षरं गिरवल्यावर मेंदूचा विकास होतो, असं सिध्द झालंय असं सुलेखनकार पूजा निलेश सांगतात.
मुलांचा सराव घ्यावा: हस्ताक्षर एका दिवसात सुधारत नाही. त्यासाठी सराव आणि सातत्य महत्त्वाचं आहे. मुलांचं चांगलं हस्ताक्षर होण्यासाठी पालकांनी मुलांचा लिहिण्याचा सराव घ्यावा त्यामुळं हस्ताक्षर चांगलं होण्यास मदत होईल. मुलांना स्वतःच्या हस्ताक्षरात भाऊ, बहीण, काका, मावशी आणि मामा यांना पत्र लिहण्यास सांगावे. यातून त्यांना लिहिण्याची सवय लागते.
मोबाईल इंटरनेटचा वाईट परिणाम: इंटरनेट आणि मोबाइलच्या युगात मुलं संभाषण करण्यासाठी टेक्स मॅसेज, व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाचा वापर करू लागलेत. त्यामुळं मुलांची लिहिण्याची सवय तुटलीय. त्यात कोविड-19 महामारीच्या काळात दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण घेण्यात आलं. त्याकाळात सर्वच विद्यार्थी मोबाइल, लॅपटॉपचा वापर करत होते. त्यामुळं आता मुलांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी पालकांनादेखील आपल्या मुलांवर कष्ट घ्यावे लागणार असल्याचं पूजा गायधनी यांनी सांगितलं.
मुलं लिहायला कंटाळा करतात: "माझा मुलगा अभ्यासात हुशार आहे. मात्र कोविड-19 काळात त्याला ऑनलाइन शिक्षणाची सवय लागली. त्या काळात त्याला चष्माही लागला. तो लिहण्यास कंटाळा करत होता. तो लिहिताना वेगानं लिहितो. त्यामुळे त्याचं अक्षर नीट कळतं नाही. त्यामुळे यंदा मी हस्ताक्षर कार्यशाळा लावली. या कार्यशाळेतून घरी आल्यावरदेखील तो हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याचं हस्ताक्षर सुधारतं आहे," असे एक मुलाच्या आईने सागितलं.
हेही वाचा
- १४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच गळती, सुरक्षेच्या प्रश्नावर पालिका प्रशासनानं काय म्हटलंय? - Mumbai Coastal Road
- आला माधव पुन्हा प्रेक्षकांकडे...नाटकाचे ६३ प्रयोगच का होणार? प्रशांत दामले यांनी सांगितलं गुपित - Prashant Damle Drama
- 35 टक्के काठावर पास! विद्यार्थ्यांनं सर्व विषयांमध्ये मिळवले परफेक्ट 35 गुण, केक कापून आनंद साजरा - Maharashtra SSC Result
- कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ; निविदा प्रक्रिया वगळून दिली होती होर्डिंगला परवानगी - Ghatkopar Hoarding Case