ETV Bharat / state

महायुतीकडून अखेर सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर; समीर भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष - NANDGAON ASSEMBLY CONSTITUENCY

महायुतीकडून अखेर सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, समीर भुजबळ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय...

Sameer Bhujbal and Suhas Kande
समीर भुजबळ आणि सुहास कांदे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 2:03 PM IST

मनमाड :- नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाचे सुहास कांदे किंवा राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यापैकी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र काल रात्री शिंदे गटांनी सुहास कांदे यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब केलंय. शिंदे गटाची पाहिली यादी जाहीर झाली असून, यादीत सुहास कांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल अखेर सुहास कांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली, या यादीत कांदे यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे कांदेंना उमेदवारी मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे घातले होते. मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे. आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. याशिवाय आज महाविकास आघाडीचीही यादी जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, यात ते आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. नांदगाव तालुक्यातील लढाई आता अत्यंत चुरशीची होणार असून, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

समीर भुजबळ तुतारी किंवा मशाल हाती घेणार? : महायुतीमध्ये घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. महायुतीतर्फे उमेदवारी मिळाली नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या प्रसार माध्यमातून समोर येत आहेत. याबाबत तालुक्यात चर्चादेखील सुरू असून, आता दुपारी महाविकास आघाडीच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत निर्णय होईल. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनमाडला गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त धात्रक यांची उमेदवारी जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्ष यादी आल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश
  2. "दादा न्याय देतील असं वाटलं होतं, पण…", पुणे शहराध्यक्षांनी व्यक्त केली खदखद; घेतला मोठा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.