ETV Bharat / state

राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याला मान्यता; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Sudhir Mungantiwar On Dandpatta : सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झालीय. या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दांडपट्ट्याबाबत मोठी घोषणा केलीय.

Sudhir Mungantiwar On Dandpatta
मंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 11:24 AM IST

प्रतिक्रिया देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार

आग्रा (छत्रपती संभाजीनगर) Sudhir Mungantiwar On Dandpatta : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक युद्धात वापरलेला दांडपट्टा आता राज्यशस्त्र म्हणून ओळखला जाईल. त्याबाबत अधिकृत घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रा येथील शिवजयंती सोहळ्यात केली. यावेळी काचेच्या पेटीत दांडपट्टा सजवून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळाचं औचित्य साधत, वाघ नखे चार मे पर्यंत भारतात येतील, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

वाघ नख मे महिन्यात भारतात : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र सरकारनं अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया म्युझियम सोबत करार केला होता. ब्रिटन सरकारनं आता परवानगी दिलीय. तर भारत सरकारनं देखील त्याला अनुमती दिलीय. दोनही देशात झालेल्या करारनुसार चार मे रोजी वाघ नखे भारताला मिळणार असल्याचं मत, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

युनेस्कोला प्रस्ताव पाठवला : ज्या किल्ल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची डरकाळी पहिली त्याच किल्ल्यात त्यांचे वंशज उदयन राजे आले होते. दिल्लीचं तख्त राखतो हा शब्द खरा करण्यासाठीच शिवजयंती साजरी करण्याचं उद्दिष्ट आहे. भिंतीना जर बोलता आलं असतं तर, या किल्ल्यातील भिंतीच्या कणाकणाने 'शिवाजी महाराज की जय' असं म्हंटलं असतं. हजारो सुपरमॅन आणि स्पायडरमॅनमध्ये जेवढी शक्ती आहे, त्यापेक्षाही अधिक शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त पंतप्रधान मोदी यांनी युनेस्को येथे मराठा लष्कराला मान्यता देण्याचा प्रस्ताव पाठवलाय. जेणेकरून जगभरात शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला जाईल अशी माहिती, मंत्री सुधीर मुगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आग्रा येथील लाल किल्यात दिली.

हेही वाचा -

  1. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती! सैन्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
  2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं शिवनेरीवर सादरीकरण; पाहा व्हिडिओ
  3. दोन वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद; राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.