ETV Bharat / state

जिद्दीपुढं शिखरही ठेंगणे! पोलिओग्रस्त दिव्यांगानं २० वेळा सर केले कळसुबाई शिखर

दिव्यांग असलेल्या शिवाजी गाडे यांनी २०१४ पासून २० वेळा कळुसाबई शिखर सर केले आहे. त्यांच्या जिद्दीमुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

दिव्यांग शिवाजी गाडे
Divyang person Shivaji Gade (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2024, 9:51 AM IST

Updated : Nov 6, 2024, 10:07 AM IST

छत्रपती संभाजीनगर- महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर म्हणून कळसूबाई शिखराची ओळख आहे. हे शिखर चढणे सामान्यांनाही आव्हानात्मक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं गडप्रेमी, निसर्गप्रेमी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी हे शिखर सर करण्यासाठी येत असतात. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जन्मत:च पोलिओग्रस्त दिव्यांग असलेल्या शिवाजी गाडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत १४ वर्षांपूर्वी कळसूबाई चढण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसुबाई शिखर इच्छाशक्तीच्या जोरावर तब्बल २० वेळा सर करून जिद्द आणि साहसाचं दर्शन घडविलं आहे.

सहकार्यासोबत अनेक ठिकाणी भ्रमंती- पैठण तालुक्यातील वडवाळी गावचे शिवाजी गाडे यांना गिरीभ्रमण आणि दुर्ग भ्रमण करण्याचा छंद आहे. या छंदाच्या माध्यमातून अकोले तालुका आणि नगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे १६४६ मीटर (५४०० फूट) उंचीचे कळसुबाई शिखर दिव्यांग शिवाजी गाडे यांनी वीस वेळा यशस्वी सर केले आहे. रविवारी ( ३ नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशी शिवाजी गाडे यांनी कचरू चांभारे, कल्याण घोलप, संतोष बटुळे, सुरज बटुळे या आपल्या चार सहकाऱ्यांसोबत कामगिरी पूर्ण करून शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आहे.

शिवजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिखरावर- १० ऑक्टोबर २०१० रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं १४ वर्षांपूर्वी त्यांनी सर्वात प्रथम कळसुबाई शिखर सर केले होते. २० पैकी तब्बल दहा वेळेस त्यांनी एकाच दिवसात चढाई आणि उतराई केली आहे. तर दहा वेळेस कळसुबाई शिखराच्या माथ्यावर रात्रीचा मुक्काम ठोकला आहे. गिरीभ्रमण आणि दुर्ग भ्रमण छंद जोपासताना त्यांनी शिवजा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना कळसूबाई शिखरावर आपल्या सोबत घेऊन गेले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रातील १६७ गड किल्ल्यांची भटकंतीदेखील त्यांनी केली आहे. या अनोख्या गिर्यारोहण कामगिरीबद्दल शिवाजी गाडे यांना जागतिक स्तरावर एक, देश पातळीवरील दोन तर राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. राज्यातील शेकडो दिव्यांगांना सोबत घेऊन प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरचा 'थर्टी फर्स्ट' कळसुबाई शिखराच्या माथ्यावर साजरा करण्याचा अनोखा उपक्रम गेल्या १४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील ३१ डिसेंबर रोजी राज्यातील दिव्यांगांची कळसुबाई शिखरावर ऊर्जा मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी गाडे यांनी दिली.

  • ब्राव्हो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारानं सन्मानित- विविध प्रकारच्या अंध, मूकबधिर, गतीमंद, बहु विकलांग अशा ४०० दिव्यांगांना कळसुबाई शिखर दाखविल्याबद्दल शिवाजी गाडे यांना ब्राव्हो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारदेखील मिळालेला आहे. या अनोख्या कामगिरीबद्दल शिवाजी गाडे यांचे राज्यभरातील दिव्यांगांनी कौतुक केलं आहे.

Last Updated : Nov 6, 2024, 10:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.