ETV Bharat / state

आचारसंहितेपूर्वी 'या' प्रक्रिया झाल्या तरच यावर्षी अमरावतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश - अमरावती मेडिकल कॉलेज

Amravati Medical College : अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता आलं असलं तरी आचारसंहितेपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (Medical Council of India) पथकाचा दौरा आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणाऱ्या जागेच्या विकासासाठी 20 कोटी रुपये तातडीनं मिळाले तरच यावर्षी या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यानंतर जुलै महिन्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात होऊ शकते.

Amravati Medical College
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 4:53 PM IST

अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी सांगताना किरण पातुरकर

अमरावती Amravati Medical College : विभागीय शहर असणाऱ्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2016 मध्ये कृती समितीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाला आता आठ वर्षानंतर यश मिळालं आहे. (Kiran Paturkar) अमरावती शहरातील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाच्या वतीनं शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलियाबाद या ठिकाणी जागा देखील निश्चित केली आहे. याविषयी अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी एकूणच संघर्षाच्या या प्रक्रिये संदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

430 खाटांचं उभारणार रुग्णालय : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 28 जून 2023 रोजी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली. अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलियाबाद वडद या ठिकाणी 11.129 हेक्टर ई क्लास जागा या महाविद्यालयासाठी मिळाली. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न असणाऱ्या 430 खाटांचं रुग्णालय बांधलं जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 खाटांचं हे रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय होणार आहे. या ठिकाणी सहा खाटांचं असणारं आयसीयू 20 खाटांचं करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालय परिसरात 50 खाटांचं स्त्रीरोग आणि प्रसुती वार्ड तयार केलं जाणार आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात तात्पुरते महाविद्यालय : अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्य झालं आहे. यावर्षी पासूनच विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि अभ्यासक्रमाला सुरुवात व्हावी यासाठी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय परिसरात तात्पुरती सोय केली जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षाला प्रात्यक्षिक नाही. यामुळं महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभी होण्यापूर्वी दोन वर्ष या परिसरात महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं किरण पातुरकर म्हणाले. या तात्पुरत्या महाविद्यालयात ज्या काही आवश्यक सुविधा आहेत त्याकरता 20 कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम शासनानं मंजूर केली असली तरी अद्याप ती प्राप्त व्हायची आहे. 20 कोटी रकमेसह प्राध्यापकांची नियुक्ती आता तातडीनं झाली तर जुलै महिन्यात निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय अभ्यासक्रमाला सुरुवात होईल, असं देखील किरण पातुरकर यांनी सांगितलं.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या पथकाची वाट : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात याच वर्षी जूनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी, यासाठी आता तातडीनं मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे पथक अमरावतीला येणं अतिशय गरजेचं आहे. या पथकानं या जागेची पाहणी केल्यावर याचवर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्यामुळे शासनानं तातडीनं मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे पथक अमरावतीला पाठवावे, अशी आमची मागणी असल्याचं देखील किरण पातुरकर म्हणाले.

शासकीय समितीला आदिलाबादची जागा आवडली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचा विषय अतिशय महत्त्वाचा होता. किरण पातुरकर म्हणाले की, अमरावतीतून शासकीय महाविद्यालयात येण्यास अडचण भासू नये म्हणून 2019 मध्ये आम्ही कोंडेश्वर मंदिर परिसरात आलियाबाद वडद येथे बेंडोजी महाराज संस्थेच्या बाजूला 27 एकर जागा सुचवली. डॉ. विजय शेगोकार यांच्या नेतृत्वात शासनाची जेव्हा समिती आली होती तेव्हा त्यांना सात-आठ जागा दाखवण्यात आल्या. त्यापैकी त्यांना आलियाबाद येथील जागा आवडली होती. त्यावेळी या जागेसाठी लागणारे 11 नाहरकत प्रमाणपत्र मिळवले. आज ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावानं सातबारावर आली आहे.

जागेत बदल होण्याची शक्यता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुचविलेली जागा अमरावती शहरापासून नक्कीच दूर आहे; मात्र त्यावेळी तातडीनं जागा सुचवण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अमरावती शहरालगत कुठे 20 एकर जागा मिळाली तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत निश्चितच बदल होऊ शकतो. खरंतर मेळघाटातील दुर्गम आदिवासी बांधवांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहज येणं शक्य होईल, अशी जागा देखील पाहता येऊ शकते असं देखील किरण पातुरकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा:

  1. प्राणी प्रेमींसाठी खुशखबर; मुंबईत उद्योगपती रतन टाटांनी प्राण्यांसाठी बांधलं रुग्णालय
  2. मंडल आयोगाला चॅलेंज करावंच लागेल; मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा
  3. पोलीसच अंधश्रद्धेच्या आहारी; पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी देऊन बनवली बिर्याणी, घटनेवर काय म्हणाले गृहमंत्री?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.