ETV Bharat / state

मराठवाड्याच्या दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, शेतकऱ्यांना होतोय आर्थिक लाभ

Strawberry Farming: मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. तरीपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील (Kannada Taluka) 9 शेतकऱ्यांनी थंड प्रदेशातील फळ स्ट्रॉबेरीचं उत्पादन (Strawberry Farming Drought Regions) घेतलं आहे. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेकडून अनुदान देण्यात आलं आहे. यातून ते मोठा आर्थिक लाभ मिळवत आहेत.

Strawberry Farming
स्ट्रॉबेरीची शेती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 4:36 PM IST

स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाविषयी माहिती देताना स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Strawberry Farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की, आपल्याला महाबळेश्वर किंवा कश्मीर अशी थंड हवेची ठिकाणं आठवतात; मात्र थंड ठिकाणी येणारं फळ दुष्काळग्रस्त मानल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या मातीत उगवत आहे. कन्नड तालुक्यातील नऊ शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी हे पीक घेतलं असून त्यामुळे मोठा आर्थिक लाभ होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. (Strawberry Production in Marathwada) जिल्हा परिषदेनं त्यासाठी सबसिडी दिल्यानं हा प्रयोग करणं शक्य झालं आहे. छोट्या प्रमाणात केलेली लागवड आता मोठं स्वरूप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून मराठवाड्याच्या स्ट्रॉबेरीची चव चाखण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे, असचं म्हणावं लागेल.

शेतकऱ्यांनी केली स्ट्रॉबेरीची लागवड : टॉमेटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हस्ता गावातील नऊ शेतकऱ्यांनी यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनं दहा हजार स्क्वेअर फूट म्हणजे दहा गुंठे जागेवर ही लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यासाठी जिल्हा परिषदेनं ७५% टक्के सबसिडी दिली असून उरलेला वाटा शेतकऱ्यांनी भरला आहे.

शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग यशस्वी : शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला असून, यामुळे वार्षिक उत्पन्नात दीड ते दोन लाखांची वाढ झाल्याची माहिती प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये उत्पादित स्ट्रॉबेरी विक्री होत असून हळूहळू कन्नड स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. टोमॅटो उत्पादनात अनेक वेळा नुकसान सोसावं लागलं. मात्र स्ट्रॉबेरीमुळे फायदा मिळत असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.

आधी अभ्यास आणि नंतर लागवड : हस्ता गावातील नऊ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याआधी सखोल अभ्यास केला. गावात स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्यात आलेलं असल्यानं परिसरातील वातावरणाचा अभ्यास आणि परीक्षण त्यांनी केलं. स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यासाठी वातावरण ३५ अंश सेल्सिअसच्या खाली असणं आवश्यक आहे आणि उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर बहुतांश दिवसांमध्ये हे वातावरण थंड राहात असल्याचं निरीक्षणात आढळून आलं. त्याचबरोबर माती परीक्षण करून कशा पद्धतीनं ही शेती आपल्याला करता येईल याबाबत देखील सर्वेक्षण करण्यात आलं.

कमी कष्टात जास्त पैसे : कृषी विभागाच्या माध्यमातून हस्ता गावातील परिसराची पाहणी केल्यानंतर तिथे स्ट्रॉबेरीची शेती करता येऊ शकते असं मत नोंदवलं गेलं. प्रयोग करण्यासाठी नऊ शेतकरी तयार झाले. त्यांनी अभ्यास दौरा देखील केला आणि त्यानंतर पूर्ण अभ्यास करूनच स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. त्यातून उत्पन्न सुरू झालं. कमी कष्टात जास्त पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. रोज दहा ते पंधरा किलो स्ट्रॉबेरी प्रत्यक्ष शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी आणत असल्यानं त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे मत दीपक आखाडे या शेतकऱ्यानं व्यक्त केलं.

उत्पादन कमी असल्यानं विक्रीस अडचणी : कन्नड तालुक्यातील हस्ता या गावात शेतकऱ्यांनी छोट्याशा जागेत हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला. त्यामुळे त्याचं उत्पादन देखील कमी प्रमाणात येत असल्यानं बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीला नेण्यास अनेक अडचणी येत आहेत. मोठ्या प्रमाणात शेती केल्यास उत्पादन वाढेल आणि बाजारपेठेत विक्रीसाठी नेताना त्याला येणारा खर्च देखील कमी होईल. त्यामुळेच येणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. गावातील किमान १५ ते २० एकर शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येणार असल्याचा मानस माजी सरपंच मनोहर निळ यांनी व्यक्त केला. तर यासाठी आता जिल्हा परिषदेकडून मोठं क्लस्टर निर्माण करावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कन्नडची स्ट्रॉबेरी खवय्यांना मोठ्या प्रमाणात चाखायला मिळेल हे नक्की.

हेही वाचा:

  1. ईव्हीएम कंपनीच्या संचालकपदी भाजपाचे 4 डायरेक्टर; संजय राऊतांचा मोठा दावा
  2. कर्नाटकातील 11 जिल्ह्यात लोकायुक्तांची छापेमारी; बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या अधिकाऱ्यांचं धाबे दणाणलं
  3. हेमंत सोरेन यांची आज ईडीकडून होणार चौकशी, अटक झाली तर कोण होणार मुख्यमंत्री?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.