ETV Bharat / state

अखेर जितेंद्र आव्हाड खरं बोलले, सुनिल तटकरेंचा टोला, अजित पवार लवकरच करणार राज्याचा दौरा - Sunil Tatkare On Jitendra Awhad - SUNIL TATKARE ON JITENDRA AWHAD

Sunil Tatkare On Jitendra Awhad : बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तसंच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे देखील आभार मानले आहेत.

Ajit Pawar, Jitendra Awhad, Sunil Tatkare
अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:23 PM IST

मुंबई Sunil Tatkare On Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असं शीतयुद्ध सुरू आहे. त्यातचं शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांनी चार वेळा अजित पवारांना वेडं बनवल्याचा दावा केला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आव्हाडांचे आभार मानले आहेत.

सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद (Reporter ETV BHARAT Maharashta)

जितेंद्र आव्हाडांचे मानले आभार : कालचं जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं. तेव्हा शरद पवारांनी चार वेळा अजित पवारांना वेडं बनवल्याचं आव्हाडांनी सांगितलं. तेच आम्ही गेल्या वर्षभरापासून सांगतोय. 2014, 2016, 2019, 1920, 2022 ला भाजपासोबत जायचं, असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. तेच आज जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलंय. त्यामुळं आमच्या बोलण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.

आव्हाडांनी खरं सांगितलं : सत्य आज ना उद्या बाहेर येत असतं. बोलण्याच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी खरं सांगितलं. जयंत पाटील मागील दहा वर्षापासून अध्यक्ष आहेत. त्यांना भाषणातून सांगावं लागलं मी अध्यक्षपद सोडल्यानंतर शरद पवारांकडं तक्रार करा. तोपर्यंत सोशल मीडियावर चार महिने काहीच बोलू नका. निवडणुकीतील यशानंतर प्रदेशाध्यक्षाला आपल्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमका काय आहे? यावर आपल्याला बोलायचं नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याची रनणीती : बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याची रनणीती आखली जात आहे. मात्र, त्यांच्या विरोधात कितीही स्ट्रॅटजी बारामतीत करु द्या. अजित पवार लाख मतांनी विधानसभेत निवडून येतील, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी काय होईल यांची कोणालाच कल्पना नव्हती. प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अभिप्रेत यश मिळालं नाही.

पराभवाचा सुक्ष्म अभ्यास सुरू : अल्पसंख्याक समाज, आदिवासी समाज असे सर्व घटक आमच्यापासून दूर गेले. त्याचा सूक्ष्म अभ्यास आम्ही करत आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारलीय. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर अजित पवार राज्याव्यापी दौरा करणार आहेत. संघटना बांधणीच्या उद्देशानं राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगरपासून सुरू होईल. यात संपूर्ण महाराष्ट्रात संवाद साधण्याचा हेतू असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा उद्या केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

हे वचालंत का :

  1. भाजपा अजित पवारांना सत्तेपासून दूर करणार; भाजपात आत्मचितंन सुरू - महेश तपासे - Ajit Pawar News
  2. मणिपूरबाबत भागवत बोलल्यानंतर आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Uddhav Thackeray On PM Modi
  3. 'या' राज्यानं भाजपाला तारल्यानं जिंकल्या 240 जागा, अन्यथा उडाली असती दाणादाण - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.