ETV Bharat / state

"घटनांमध्ये होणारी वाढ पाहता जागरुक राहा,"- बदलापूर घटनेनंतर रुपाली चाकणकरांचा पालकांना सल्ला - Minor Girls Sexual Assault Case - MINOR GIRLS SEXUAL ASSAULT CASE

Rupali Chakankar On Badlapur Case : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Rupali Chakankar reaction on Badlapur Minor Girls Sexual Assault Case
रुपाली चाकणकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 8:54 PM IST

पुणे Rupali Chakankar On Badlapur Case : बदलापूरमध्ये दोन चारवर्षीय चिमुकलींवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं बघायला मिळतंय. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय. तर या प्रकरणावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

रुपाली चाकणकर पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? : यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यानं तक्रार घेण्यास विलंब केला त्यालाही निलंबित करण्यात आलंय." बदलापूरमधील एका शाळेत स्वच्छतागृहामध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाला. यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं,"अशा घटना घडू नये यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीनं शालेय स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र, अशा घटनांमध्ये होणारी वाढ पाहता पालकांनीदेखील जागरुक राहावं," असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी पालकांना केलंय.

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाल्या? : गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात चाकणकरांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांची भूमिका काय होती. आता ते काय भूमिका मांडत आहेत? हे सर्वांनाच माहित आहे. या घटनेत पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. विरोधकांनी विरोध करावा. मात्र, त्याचं राजकारण करू नये. तसंच समाजात दुफळी निर्माण होईल असं वक्तव्य करू नये", असं चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय", शिवसेना नेत्याची महिला पत्रकाराबद्दल मुक्ताफळं - Badlapur Rape Case
  2. "फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे...", बदलापूर घटनाप्रकरणी महिला नेत्यांचा संताप - Minor Girl Sexual Assault Case
  3. चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर आंदोलक आक्रमक, बदलापूर स्थानकावर पोलिसांबरोबर धुमश्चक्री - badlapur school girls case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.