ETV Bharat / state

मुंबईत लवकरच मोफत वायफाय सुविधा सुरू होणार; कोणाला मिळणार लाभ? - Free Wi Fi In Mumbai - FREE WI FI IN MUMBAI

Free Wi Fi In Mumbai : मुंबईत पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. यादृष्टीने राज्य सरकार विचारमंथन करत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सांगितले आहे.

Free Wi Fi In Mumbai
मोफत वायफाय सुविधा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 5:17 PM IST

मुंबई Free Wi Fi In Mumbai : मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये कोट्यवधी पर्यटक आणि व्यापारासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना मुंबईत येताच मुंबईत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. राज्य सरकारने सुरू केलेला हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेला आहे. हा उपक्रम पुन्हा एकदा कार्यान्वित करून परदेशी नागरिकांना किमान सोय उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली.

प्रायोगिक तत्त्वानंतर योजना बंद : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच सोबत अत्यंत महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेलं शहर आहे. मुंबईमध्ये मोफत वायफाय संकल्पना मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 2017 मध्ये राबविण्यात आली होती; मात्र मोफत वायफाय 500 ठिकाणी सुरू करण्याच्या प्रायोगिक तत्त्वानंतर ही योजना बंद झाली. मुंबई महानगरपालिकेच्या गत निवडणुकीपूर्वी मुंबई सुमारे 1200 ठिकाणी मोफत वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यात येणार होते; मात्र कालांतराने ही योजना बंद पडली. आता सध्या मुंबईत ही योजना पूर्ण बंद अवस्थेत असल्याची माहिती पराग जैन यांनी दिली आहे.

एल अँड टी यांना कंत्राट : मुंबई परिसरातील सर्व मोफत वायफाय योजना ही एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएने एल अँड टी या कंपनीला कंत्राटही दिले होते; मात्र त्यानंतर एमएमआरडीएने हे कंत्राट रद्द करीत मुंबईत मोफत वायफाय सुरू करण्यात बाबत माघार घेतली. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई परिसरात मोफत वायफाय ही संकल्पना सुरू नाही. वास्तविक मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. परदेशातून विविध कारणांनी पर्यटक म्हणून किंवा उद्योग व्यापारासाठी मुंबईत येणाऱ्या परदेशी नागरिकांची दर वर्षाची संख्या ही दीड कोटीच्या आसपास आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळाबाहेर पडतात टॅक्सी बुक करायची असेल अथवा अन्य काही ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर त्यासाठी वायफायची गरज असते.

सेवाशुल्क आकारा मात्र वायफाय द्या : किमान दोन ते पाच मिनिटे या प्रवाशांना मोफत वायफाय वापरता येईल यासाठीची सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा आंतरराष्ट्रीय शहर असलेलं मुंबई शहर हे अन्य शहरांच्या तुलनेत मागास असल्याची अप्रतिष्ठा होऊ शकते. त्यामुळे किमान दोन मिनिटे मोफत वायफाय आणि त्यानंतर वाटल्यास संबंधित मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या नियमानुसार पैसे आकारले तरी हरकत नाही; परंतु तोपर्यंत तरी पर्यटकांना मोफत वायफाय वापरता यावा यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याच्या आयटी विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली.

लवकरच पुन्हा प्रयत्न करणार : मुंबई शहरातील बंद असलेली मोफत वायफाय सेवा योजना पुन्हा कशी कार्यान्वित करता येईल, त्यासाठी लागणारा 100 कोटी रुपयांचा निधी कसा उभा करता येईल आणि मोबाईल कंपन्या यांच्या माध्यमातून ही सेवा कशी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल, यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचंही जैन यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. बिहारमध्ये ६५ टक्के आरक्षण देणारा कायदा रद्द, नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाचा झटका - Bihar reservation Law
  2. गव्हर्मेंट शेअर्स प्रकरणी 14 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला EOW ने कोलकात्यातून केली अटक - Government Shares Case
  3. कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.