ETV Bharat / state

ड्रग्जविरोधात सरकार अ‍ॅक्शन मोडवर, पाच महिन्यात केला ४ हजार कोटींचा माल जप्त, ६ पोलीस बडतर्फ - State Government Action On Drug

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 9:19 PM IST

State Government Action On Drug : मुंबईमध्ये लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त (Drug) केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी आज विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, राज्यात पाच महिन्यात ६५२९ कारवाया केल्या असून ४ हजार १३१ कोटींचा माल जप्त केला आहे.

State Government Action On Drug
शिंदे फडणवीस सरकार (File Photo)

मुंबई State Government Action On Drug : राज्यात तरूणपिढी ड्रग्ज (Drug) विळख्यात सापडली आहे. ड्रग्ज माफियांचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानुसार अवघ्या पाच महिन्यात ६५२९ कारवाया केल्या असून ४ हजार १३१ कोटींचा माल जप्त केला. तसेच ड्रग्ज माफियांना संगनमत करणाऱ्या सहा पोलीसांना बडतर्फ केल्याची माहिती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत दिली.

ड्रग्ज विक्रीला आळा : आमदार भाई जगताप यांनी मुंबईसह राज्यातील वाढत्या ड्रग्ज विक्रीच्या घटनांकडं लक्ष वेधलं. सरकारनं ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली असता यावर फडणवीस यांनी या प्रश्नांवर उत्तर दिलं.

शून्य सहनशीलता धोरण : राज्यात अंमली पदार्थाचं मोठं आव्हान उभे असून, चिंतेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना 'संयुक्त कृती आराखडा' सादर केला. सध्या ड्रग्ज विक्रीचे विविध केंद्र देशभरात सुरू आहेत. कुरीअर मार्फत, इस्ट्राग्राम, फेसबूक चॅट किंवा अन्य मॅसेंजरच्या माध्यामातून विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी विक्रीही मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळं एक शून्य सहनशीलता धोरण शासनाने हाती घेतलंय. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक नेमले आहेत. सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सविस्तर अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा, अशी सक्ती केलीय.

वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी डॅग्ज स्कॅनर : समुद्र किनारची बंदरे असो किंवा अन्य ठिकाणीच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी डॅग्ज स्कॅनर लावले आहेत. त्यामुळं कोणत्या कंटेनरमध्ये कुठलाही अमली पदार्थ शोधण्यास मदत होईल. तसेच तंत्रज्ञानाद्वारे नवीन विक्री केंद्र कशाप्रकारे संपवता येतील, यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एका प्रकरणाची लिंक उत्तराखंडला मिळाली. तेथील पोलिसांची समन्वयाचा साधून कारवाई सुरू केल्याची माहिती फडणवीस यांनी म्हटलं.

४१३१ कोटींचा माल जप्त : २०२३ मध्ये मुंबईत ४ कोटी रुपयांचा माल पकडला होता. तर संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी १२ हजार ६४८ कारवाया केल्या. त्यात ८९७ कोटी रुपयांचा माल मिळाला होता. यंदा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ६ हजार ५२९ कारवाया केल्या आहेत. यात ४ हजार १३१ कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली. तसेच या सगळ्या प्रकारात पोलिसांचा सहभाग असल्यास तातडीनं त्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यापूर्वी ६ पोलिसांना बडतर्फ केल्याचं फडणवीस यांनी परिषदेत स्पष्ट केलंय.

पोस्ट ऑफिस, कुरीयर कंपनीला सूचना : कुरियर कंपन्या आणि भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक कुरीयर कंपन्या आणि पोस्ट ऑफिसना भेटी दिल्या आहेत. दरम्यान, ड्रग्ज विक्रीवर कशा प्रकारे बंधन घालता येतील, याबाबत सूचना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. पुणे ड्रग्ज प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही; अनधिकृत ठिकाणी बुलडोझर फिरणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM Eknath Shinde On Pune Drugs Case
  2. ३२७ कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त, मुख्य सूत्रधार सलीम डोळाचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन उघड - 327 crores MD drug seized
  3. तीन ड्रग्ज तस्करांना पुणे पोलिसांकडून अटक, एका नायजेरियन नागरिकासह पुण्यातील दोघांचा समावेश - Pune drug case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.