ETV Bharat / state

Hariyal Birds Story : वसंतात हरियाल; पिंपळाच्या झाडावर गुंजतोय राज पक्ष्यांचा किलबिलाट, पाहा व्हिडिओ

Hariyal Birds Story : महाराष्ट्राचा राज्य पक्षी (State Birds Hariyal) म्हणून ओळख असलेला 'हरियाल' मेळघाटच्या जंगल परिसरात दिसू लागला आहे. हरियाल पक्ष्यांचे थवे मार्च-एप्रिलच्या दरम्यान पाहावयास मिळतात. वडाच्या झाडांची फळे परिपक्व होऊ लागताच या परिसरात ‘हरियाल’ पक्ष्यांची रेलचेल वाढत असते.

Hariyal Birds
हरियाल पक्षी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 5:16 PM IST

पिंपळाच्या झाडावर गुंजतोय राज पक्ष्यांचा किलबिलाट

अमरावती Hariyal Birds Story : हिरवा, करडा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असणारा महाराष्ट्राचा राज्यपक्षी अर्थात 'हरियाल' पक्षी (State Birds Hariyal) मेळघाटच्या जंगलासह ज्या ठिकाणी वड आणि पिंपळची मोठी झाडं आहेत त्या ठिकाणी आढळतो आहे. हरियालसह या पक्षाला हरिल, हरळी आणि हरोळी या नावानं देखील ओळखलं जातं. मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी या गावालगत वड आणि पिंपळच्या झाडावर सायंकाळी या पक्ष्यांचे थवे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

असं आहे हरियालचे वैशिष्ट्य : महाराष्ट्राचा राज्यपक्षी अशी ओळख असणारा 'हरियाल' हा वड आणि पिंपळ या वृक्षांवर अधिक प्रमाणात राहतो. हा पक्षी कधी एकटा राहात नसून या पक्ष्यांचा थवा वड आणि पिंपळाच्या झाडावर दिसतो, अशी माहिती पक्षी निरीक्षक प्रदीप हिरुळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. वड आणि पिंपळ या वृक्षांना आता वसंत ऋतूत येणारी फळं चाखण्यासाठी हे पक्षी या वृक्षांवर आढळतात. दुर्मीळ होत चाललेले हे पक्षी मेळघाटातील जंगलांसह अमरावती शहरात असणाऱ्या विदर्भ महाविद्यालय परिसर आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वडापिंपळाच्या झाडांवर आढळतात.

शिकारीमुळे झाले दुर्मीळ : हरियाल अतिशय साधा आणि सुंदर दिसणारा पक्षी आहे. अनेकदा तो पोपटासारखाच भासतो. या पक्षाची मान छाती पोट पिवळ्या रंगाचे आहे, तर पंख हिरवट राखाडी रंगाचे आहेत. या पक्षाचे पाय आणि चोच पिवळ्या रंगाची आहे. पक्षाच्या मानेवर निळ्या रंगाचा ठिपका आढळतो. हरियाल आणि पोपट-कबुतर यांचे अनेक गुणधर्म हे समानच पाहायला मिळतात. अतिशय साध्या स्वभावाच्या असणाऱ्या या पक्षाची मोठ्या प्रमाणात शिकार झाली आहे. शिकारीमुळंच हा पक्षी दुर्मीळ झाला असल्याचं प्रदीप हिरुळकर यांनी सांगितलंय.

विदर्भात अनेक भागात आढळतो हरियाल : हरियाल पक्षी दुर्मीळ असला तरी तो मुळातच महाराष्ट्रातील अनेक भागात आढळतो. विदर्भातील जवळपास सर्वच जंगलामध्ये हरियालचं वास्तव्य आहे. जंगल परिसरासह ज्या भागात वड आणि पिंपळचे मोठी वृक्ष आहेत त्या ठिकाणी देखील हरियाल आढळून येतो. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल, आसाममध्ये देखील हरियाल हा पक्षी दुर्मीळ झाला असला तरी अनेकदा आढळतो.

मेळघाटच्या पायथ्याशी हरियालचा थवा : मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गडी या गावालगत पिंपळाच्या भल्या मोठ्या झाडावर गत आठ दिवसांपासून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हरियालचा थवा आढळतो. या झाडाला आलेल्या बोरासारख्या फळांना खाण्यासाठी हरियाल सध्या रोजच थव्यानं या झाडावर बसत आहेत. अनेकांना झाडावर पोपट बसले आहेत असं सुरुवातीला वाटलं, मात्र पोपटापेक्षा थोडा वेगळा असणारा हा 'हरियाल' असल्याचं लक्षात येताच अनेक पक्षी निरीक्षक धामणगाव गढी या गावात हरियालला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पोहोचले आहेत.

हेही वाचा -

  1. वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  3. काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.