ETV Bharat / state

साईनगरीत गोकुळाष्टमीची धूम, साईभक्तांनी दहीहंडी फोडत उत्सव केला साजरा - Shirdi Saibaba Dahi Handi - SHIRDI SAIBABA DAHI HANDI

Shirdi Saibaba Dahi Handi : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येतेय. रात्री ठीक बारा वाजता साईबाबा मंदिरात श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर दुपारी साईबाबा मंदिरात दहीहंडी फोडून गोपाळ काला साजरा करण्यात आला. यावेळी साईभक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

Shirdi Saibaba Dahi Handi
साईबाबांच्या दरबारात दहीहंडीचा सण साजरा (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 4:34 PM IST

Updated : Aug 27, 2024, 10:04 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Shirdi Saibaba Dahihandi : साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. साई समाधी मंदिरासमोरील स्टेजवर पुणे येथील ह.भ.प प्रज्ञा देशपांडे महाराज यांचं किर्तन ठेवण्यात आलं होतं. किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी पाळणा हलवत श्रीकृष्ण जन्माचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईबाबांच्या दरबारात दहीहंडीचा सण साजरा (Source - ETV Bharat Reporter)

साईबाबा मंदिरात दहीहंडी उत्सव : साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपाच्या स्‍टेजवर पुणे येथील ह.भ.प. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांचं गोपाळ काला किर्तन पार पडल. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते. किर्तनानंतर दुपारी बारा वाजता साईबाबांच्या समाधी मंदिरात साई संस्थानच्या वतीनं फुलांनी सजवून बांधण्यात आलेली दहीहंडी फोडली. साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांच्या वंशज कुटुंबातील सदस्‍य सर्जेराव कोते यांच्‍या हस्‍ते ही दहीहंडी फोडण्‍यात आली.

साई भक्तांची गर्दी : यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, साई संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

शिर्डीत विविध कार्यक्रमांचं आयोजन : दहीहंडी फोडल्यानंतर साईबाबांची दुपारची आरती पार पडली आणि दोन दिवस शिर्डीत चाललेला हा उत्सव समाप्त झाला. आज गोपाळ कालानिमित्तानं साईबाबांच्या समाधी समोर दिवसभर श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी शिर्डीत गर्दी केली.

साईनगरी भक्तीमय : 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या साईबाबांनी आपल्या जीवनकाळात अनेक लिला दाखवल्या. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याचं ग्रामस्थ सांगतात. त्यामुळं देश, विदेशातील लाखो भाविक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साईबाबांच्या शिर्डीत साजरा करण्यासाठी येतात. मुंबई आणि भोपाळ येथील काही भाविकांनी साई मंदिर परिसरात श्रीकृष्ण मूर्तीची पूजा करत केक कापून श्रीकृष्ण जन्माचं स्वागत केलं.

हेही वाचा

  1. ढाक्कू माक्कूम ढाक्कू माक्कूम! गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यास सज्ज, भाजपा नेते किरीट सोमैयांनी फोडली हंडी - Dahi Handi Festival 2024
  2. मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News
  3. गोविंदा आला रे... आला..., 'या' आहेत मुंबईच्या प्रसिद्ध दहीहंड्या - Dahi Handi 2024

Last Updated : Aug 27, 2024, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.