ETV Bharat / state

अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा; अवघी वस्त्रनगरी झाली भगवीमय - राम मंदिर उद्‌घाटन

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील इचलकरंजी शहरातून आज प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. (Shree Ram Procession) ज्यामध्ये श्री काळाराम मारुती ट्रस्ट, ताराराणी पक्ष आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी सहभाग नोंदविला. (Ram Mandir Inauguration) यावेळी नागरिकांनी भगवी वस्त्र परिधान करून वाद्यांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला.

Grand Procession From Ichalkaranji
शोभायात्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 9:19 PM IST

पारंपरिक वेषभूषा करून शोभायात्रेत सहभागी झालेले रामभक्त

कोल्हापूर Ram Mandir Pran Pratishtha : राम जन्मभूमी अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत आहे. (RamMurthy PranPratishtha) या पार्श्वभूमीवर राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत श्री काळाराम मारुती ट्रस्ट, ताराराणी पक्ष आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. (Procession in Kolhapur) ढोल-ताशा, लेझीम आणि भगवे वस्त्र धारण करून पारंपारिक वेशभूषा केलेले महिला आणि पुरुष शोभायात्रेत सहभागी झाले होते. यामुळे अवघी वस्त्र नगरी भगवीमय झाली होती.

भक्तिमय वातावरणात शोभायात्रा : वस्त्रनगरी इचलकरंजीतील काळा मारुती मंदिरात श्री हनुमानाची आणि प्रभू श्रीरामांची आरती करून सुरू झालेली ही शोभायात्रा शिवतीर्थ, जनता चौक मार्गे श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो इचलकरंजीकरांनी भगवे वस्त्र, परिधान करून ध्वज हाती घेऊन जय श्रीरामाच्या घोषणा देत सहभाग नोंदविला. ढोल ताशाचा गजर आणि लेझीमचा ठेका, धनगरी ढोलाच्या नादात आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा पार पडली.

पारंपरिक नृत्य, धनगरी ढोल आकर्षण : शोभायात्रा मार्गावर पारंपरिक वेशभूषेत धनगरी नृत्यांचा अविष्कार, लेझीम आणि झाजंपथक यामुळं शोभायात्रा मार्गावर चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. मार्गावर ठिकठिकाणी जेसीबीमधून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिकात्मक मूर्ती असलेल्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्त्रनगरी इचलकरंजीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.

कोल्हापुरातील प्रमुख मार्गावर भव्य शोभायात्रा : भाजपाच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, दसरा चौक मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या यात्रेत कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह स्थानिक भाजपाचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संलग्नित विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' जमावानं अडवली, मोदी-मोदीच्या घोषणा, फ्लाइंग किसनं उत्तर
  2. चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन
  3. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, विधी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.