ETV Bharat / state

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 'मीच' उमेदवार-शिवाजीराव आढळराव पाटील - शिरूर लोकसभा मतदार संघ

Shirur Lok Sabha : शिरूर लोकसभा जागेसाठी आग्रही असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचं अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर माजी खासदार आढळराव पाटल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Shirur Lok Sabha
आढळराव पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 7:59 PM IST

मला धनुष्यबाण घेऊन लढायचं आहे

पुणे Shirur Lok Sabha : शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोठा दावा केलाय. शिरूरच्या उमेदवारीबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी काम थांबवू नका, असं मला सांगितलं आहे. पण, पक्ष जो उमेदवार देईल त्यांचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी शिवसैनिक आहे. मला धनुष्यबाण घेऊन लढायचं आहे. शिरूरमधून सुनेत्रा पवार, वळसे पाटील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहतील, असं मला वाटत नाही." असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणतील तसं काम करणार : शिरूरच्या उमेदवारीबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "तुम्हाला वाटतं तसं नाही. मला लोकसभा मिळाली नाही तरी, मी तिकीटासाठी कधीच फिरत नाही. मी माझा बहुतांश वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकांच्या समस्या सोडवण्यात घालवला. आज म्हाडाची अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • मीच उमेदवार असणार : "शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मीच उमेदवार असणार, अशी मला खात्री आहे. पण मुख्यमंत्री तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांनी महायुती उमेदवार दुसरा ठरवला, तर त्याचाही प्रचार करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची माझी भूमिका आहे," असे आढळराव पाटील म्हणाले.

अमोल कोल्हे यांच्यावर टीका : " खासदार अमोल कोल्हे आपलं अपयश झाकण्यासाठी बेंबीच्या देठापासून बोलत आहेत. त्यांना पाच वर्षात काहीच करता आलं नाही. मी मंजूर केलेली पाच बायपास रस्त्यांची कामे माझी आहेत. ते काम करत नसून फक्त श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मी बैलगाडी शर्यतीसाठी काम केलं. अनेकांनी मला विरोध केला आहे. मी अमोल कोल्हेंसारखा पक्ष बदलला नाही. अमोल कोल्हे यांनी अनेकदा पक्ष बदलले. ते नेते आहेत की अभिनेते हे त्यांना माहीत आहे. मी त्याच शिवसेनेत आहे, असा टोला त्यांनी अमोल कोल्हेंना लगवाला आहे.

हे वाचलंत का :

  1. भाजपानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय दिला प्रस्ताव? जाणून घ्या, इनसाईड स्टोरी
  2. पंतप्रधान मोदींच्या लेखणीची किंमत २५ लाख; संजय राऊतांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
  3. उद्धव ठाकरे आजपासून बुलडाणा दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचं फुंकणार रणशिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.